Sat, Jul 20, 2019 08:38होमपेज › Marathwada › क्षयरोगाच्या रुग्णांना 500 रुपये महिना 

क्षयरोगाच्या रुग्णांना 500 रुपये महिना 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

परभणी : प्रतिनिधी

क्षयरोग हा एक जिवाणूजन्य गंभीर आजार असून हा आजार औषधोपचाराने पूर्णपणे बरा होतो. यामुळे 1 एप्रिलपासून क्षयरोग निर्मूलनाकरिता विशेष मोहीम राबविली जात आहे. क्षयरोगाच्या उपचारापासून एकही  रुग्ण वंचित राहता कामा नये असा सज्जड इशारा जि.प.उपाध्यक्षा तथा आरोग्य सभापती भावना नखाते यांनी आरोग्य अधिकार्‍यांना दिला .त्याचबरोबर अशा रुग्णांना  दरमहा 500 रुपये दिले जाणार आहेत अशीही माहिती दिली.

यावेळी जि.प.सदस्य श्रीनिवास जोगदंड, भगवान सानप,अंजली देशमुख, उमा  वाकणकर, वसुंधरा घुंबरे, शालिनीताई राऊत, विशाखा सोळंके, सुषमाताई देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे,अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी नखाते यांनी 2 उपजिल्हा रुग्णालय, 7 ग्रामीण रुग्णालय, 31 प्राथमिक आरोग्य केंद्र, 214 उपकेंद्र, स्री रुग्णालय व जिल्हा रुग्णालयातील आरोग्य यंत्रणेचा पूर्ण आढावा घेतला.तसेच 1 एप्रिलपासून  ग्रामीण भागातील गावागावांत, तांड्यात व वस्तीत क्षयरोग रुग्णांची तपासणी मोहीम प्रभावीपणे राबवावी.

आढळून आलेल्या रुग्णांना क्षयरोग(टि.बी)  हा औषधोपचाराने पूर्णपणे बरा होतो व औषधोपचार पध्दतीबाबत  समुपदेशन करावे व तत्काळ औषधोपचार सुरू करावा अशा सूचना दिल्या.तसेच या रुग्णांना सहा ते आठ महिन्यांपर्यंत दरमहा 500 रुपये देण्यात यावे असे निर्देश  अधिकार्‍यांना बैठकीत दिले. मात्र क्षयरोगाचा एकही रुग्ण उपचारापासून वंचित राहता कामा नये असा सज्जड इशाराही दिला.यावेळी उपलब्ध औषधी साठ्यांचा आढावा घेऊन ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात महिलांची प्रसूती झाली पाहिजे या विषयावर चर्चा झाली. 

Tags : Marathwada, Marathwada News, Rs 500, month, TB patients


  •