Fri, Nov 16, 2018 19:14



होमपेज › Marathwada › जालना : वडीगोद्रीत चोरट्यांचा धुमाकूळ; दोन घरे फोडली

जालना : वडीगोद्रीत चोरट्यांचा धुमाकूळ; दोन घरे फोडली

Published On: Aug 07 2018 9:23AM | Last Updated: Aug 07 2018 9:23AM



वडीगोद्री : प्रतिनिधी

वडीगोद्री येथे चोरट्यांनी धुमाकूळ घालत श्री गुरुदेव कॉलनीत आणि गावात दोन ठिकाणी घरे फोडली. घरातील तिघांना शस्‍त्रांचा धाक दाखवून ५० हजार रुपये किमतीचे सोने आणि २५ हजार रुपये लंपास केले. तर दुसर्‍या एका ठिकाणाहून ९० हजार किमतीच्या सोन्यासह २५ हजार घेऊन ५ चोरटे फरार झाले. मंगळवारी पहाटे २.३० च्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर पोलिस आणि गावकर्‍यांनी चोरट्यांचा अयशस्‍वी पाठलाग केला. 

वडीगोद्री येथील विजय छल्‍लारे आणि राम भोसले यांच्या घरावर चोरट्यांनी मध्यरात्री दरोडा टाकला. त्यानंतर गावकर्‍यांनी पोलिसांनी घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तात्‍काळ घटनास्‍थळी दाखल होत चोरट्यांचा पाठलाग केला. परंतु यात त्यांना अपयश आले.

पोलिस उपनिरीक्षक हनुमंत वारे यांनी चोरट्यांचा पाठलाग करताना त्यांना रोखण्यासाठी गोळीबार केला. परंतु चोरटे औरंगाबाद-सोलापूर महामार्गावरून पळून गेले. त्यानंतर डॉग स्‍कॉड आणि ठसे तज्‍ज्ञांना पाचारण करण्यात आले असून चोरट्यांचा शोध सुरू आहे.