Wed, Jul 17, 2019 10:58होमपेज › Marathwada › नद्यांना पूर मात्र स्थिती नियंत्रणात

नद्यांना पूर मात्र स्थिती नियंत्रणात

Published On: Aug 22 2018 12:57AM | Last Updated: Aug 21 2018 11:55PMपरभणी : प्रतिनिधी

दोन दिवस झालेल्या संततधार पावसाने जिल्ह्यात विश्रांतीनंतर पुन्हा हजेरी लावली आहे. यामुळे काही नद्यांसह ओढे-नाल्यांना पूर आला आहे. 20 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजल्यापासून ते 21 ऑगस्टच्या सकाळी 8 वाजेपर्यंत जिल्ह्यातील 39 मंडळांमध्ये 51.99 मि. मी. पाऊस झाला. 

सर्वाधिक पाऊस पूर्णा तालुक्यातील ताडकळस मंडळात 84 मि. मी. इतका पाऊस झाला आहे. त्या खालोखाल सेलू तालुक्यातील देऊळगाव मंडळात 80 मि. मी., पाथरी मंडळात 74, पूर्णा 71, पालम मंडळ 69 मि. मी. असा पाऊस झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील बहुतांश सर्व नद्यांना पूर आला असून काही ठिकाणी छोट्या-छोट्या नद्यांचे पाणी रस्त्यावर आल्याने वाहतूक बंद झाली, परंतु पावसाचा जोर कमी झाल्याने नद्यांना पूर जरी आलेला असला तरी अद्यापपर्यंत जिल्ह्यात कुठेही आपत्तीजनक परिस्थिती नसल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पवन खांडके यांनी दिली आहे.

मंडळनिहाय एकूण परभणी 55.50, पाथरी 61, पालम 55.67, पूर्णा 55.67, गंगाखेड 46.50, सोनपेठ 59, सेलू 45.80 मि. मी. पाऊस झाला आहे. यात परभणी शहर 58, परभणी ग्रामीण 54, सिंगणापूर 62, दैठणा 55, झरी बु. 54, पेडगाव 44, पिंगळी 65, जांब 52, पालम 69, चाटोरी 53, बनवस 45, पूर्णा 71, ताडकळस 84, चुडावा 59, लिमला 48, कात्नेश्‍वर 52, गंगाखेड 63, राणीसावरगाव 40, माखणी 35, महातपुरी 48, सोनपेठ 61, आवलगाव 57, सेलू 53, देऊळगाव 80, कुपटा 28, वालूर 32, पाथरी 74, बाभळगाव 32, हादगाव 77, जिंतूर 28, सावंगी म्हा. 46, बोरी 32, चारठाणा 25, आडगाव बु. 40, बामणी 39, मानवत 42, केकरजवळा 46, कोल्हा 52 मि. मी. जिल्ह्यात असा एकूण सरासरी 51.99 मि. मी. पाऊस झालेला आहे. दरम्यान जिल्ह्यात पावसाचे प्रमाण वाढले असून ऑगस्ट महिन्यात 27 मंडळांमध्ये सरासरी 100 टक्केच्या वर पावसाची नोंद झाली आहे. पाथरी तालुक्यातील तीनही मंडळांत मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत पाथरी मंडळात 74 मि. मी., आजपर्यंत 580.50 मि. मी. तर बाभळगाव मंडळात 32 मि. मी., आजपर्यंत 290.00 मि. मी. तर हादगाव मंडळात 77 मि. मी. तर आजपर्यंत 296.50 मि. मी. पाऊस झाला आहे.