Thu, Jul 18, 2019 16:49होमपेज › Marathwada › पॅजो रिक्षा पलटल्याने दोन क्रिकेटपटूंचा मृत्यू  

पॅजो रिक्षा पलटल्याने दोन क्रिकेटपटूंचा मृत्यू  

Published On: Mar 24 2018 6:05PM | Last Updated: Mar 24 2018 6:05PMजळगाव: पुढारी प्रतिनिधी 

पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वरर रस्त्यावर शनिवारी सकाळी 11 वाजता पॅजो पलटल्याने अपघात झाला. या अपघातात दोन क्रिकेटपटूचा मृत्यू झाला तर इतर 12 जण जखमी झाले.

औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील निंबायती न्हावी तांडा येथील तरुण पिंपळगाव हरेश्वतर गावाजवळील पिंप्री येथे क्रिकेट स्पर्धेसाठी खेळण्यासाठी पॅजो रिक्षाने (क्रमांक एम.एच 19 बीएम 2333) जात होते.पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्व र रस्त्यावर ही रिक्षा भरधाव चालत असताना पलटी झाली. 

अपघातात भरत शिवदास राठोड (20) व राहुल हरी जाधव (20)(दोन्ही रा.निंबायती न्हावी तांडा, ता.सोयगाव) यांचा मृत्यू झाला. तर अन्य 7 जण जखमी झाले. चेतन वसंत राठोड, अश्वि(न अरुण पवार, राजन पारस राठोड, दिनेश सुरेश पवार, सचिन हिरा राठोड, रवींद्र शिवदास पवार, दिनेश किसन राठोड अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी राजेद्र प्रभाकर राठोड याने दिलेल्या फिर्यादीवर पॅजो रिक्षा चालक व मालक रवींद्र पवार याच्याविरूध्द पिंपळगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Tags :Rickshaw Accident, Jalgaon