Fri, May 24, 2019 01:09होमपेज › Marathwada › मानवत येथे मॅरेथॉन स्पर्धेला प्रतिसाद

मानवत येथे मॅरेथॉन स्पर्धेला प्रतिसाद

Published On: May 16 2019 2:06AM | Last Updated: May 15 2019 7:05PM
मानवत : प्रतिनिधी

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने शहरात मंगळवारी (ता. १४) आयोजीत केलेल्या मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील महाराणा प्रताप चौक येथे सकाळी सहा वाजता स्पर्धेचे उदघाटन अँड.सतिष बारहाते यांच्या हस्ते झाले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जयंती संयोजक समितीचे प्राचार्य केशव शिंदे,  बालाजी गजमल, प्रा.अनुरथ काळे, अॅड. सुनील जाधव, उद्धव हारकाळ, डिंगाबर भिसे, किशन भिसे, वैजनाथ महिपाल, संतोष गलबे यांची प्रमुख उपस्थिती  होती.

या स्पर्धेत मुलांच्या गटात प्रथम क्रमांक किरण म्हात्रे यांने द्वितीय छगन बोंबले तर आदित्य शिंदे यांने तृतीय क्रमांक प्राप्त केला.मुलींमध्ये प्रथम क्रमांक अश्विनी जाधव, द्वितीय निकिता म्हात्रे यांनी प्राप्त केला. मुलांच्या लहान गटात शिवाजी बनगर प्रथम क्रमांक अर्जुन दहे यांने द्वितीय क्रमांक तर लखनसिंग चव्हाण याने तृतीय क्रमांक प्राप्त केला. मुलींच्या लहान गटात अश्विनी तुरूकझाडे हिने प्रथम तर माधुरी शास्त्री यांनी द्वितीय तर  गौरी दहे यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. पुरुषांच्या जेष्ठ गटामध्ये मंगेश नवसाळकर यांनी  प्रथम तर जानकीराम मोरे यांनी द्वितीय क्रमांक मिळवला.