होमपेज › Marathwada › स्वेच्छानिवृत्ती की राजीनामा; उपोषण होताच अधिकारी रजेवर

स्वेच्छानिवृत्ती की राजीनामा; उपोषण होताच अधिकारी रजेवर

Published On: Aug 18 2018 1:01AM | Last Updated: Aug 18 2018 12:21AMगंगाखेड : प्रतिनिधी

गंगाखेड आगारातील चालक व्यंकटी बळीराम कातकडे यांनी आगारातील वरिष्ठाच्या छळास कंटाळून दि.27 ऑगस्ट 2015 मध्ये स्वेच्छा निवृत्ती घेतली. विभाग नियंत्रक कार्यालयाने मात्र तीन महिने अगोदर 27 मे 2015 मध्येच त्यांचा राजीनामा मंजूर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने या प्रकणाची सखोल चौकशी करून संबंधितावर कार्यवाही करण्याच्या मागणीसाठी बालजी कातकडे यांनी विभाग नियंत्रक कार्यालयासमोर भरपावसात उपोषण सुरू करताच विभाग नियंत्रक जालिंदर शिरसाठ यांनी दखल न घेता उपोषण सोडविण्या ऐवजी चक्क रजेवर गेल्याचा प्रकार घडला.

विभाग नियंत्रक कार्यालयासमोर दि.14 आँगष्टपासुन उपोषण सुरू आहे. परभणी अस्थापना व वाणिज्य विभागाने बसस्थानकातील कँटींन, रसवंतीगृह  बेकायदेशीर देवून महामंडळाचे आर्थीक नुकसान केले याची चौकशीची मागणी होती.  यास कंटाळून चालक कातकडे यांनी दि.27 आँगष्ट 2015 रोजी स्वेच्छा निवृती अर्ज गंगाखेड आगारप्रमुखांकडे दिला. तो विभाग नियंत्रकांकडे दि.28 आँगष्ट 2015 रोजी गेला. यात खाडाखोड करून स्वेच्छा निवृतीचे रुपांंतर राजीनाम्यामध्ये केले. यामुळे चालक यांचा मुलगा बालाजी यांनी चौकशीची मागणी केली. या अहवालाची माहिती अधिकारात  कागदपञे मागवून घेतली. गंगाखेड कार्यालयाने स्वेच्छानिवृतीचे पञ जा.क्र.335 दि.27 आँगष्ट 2015 रोजी  विभाग  कार्यालयात पाठविले. तसेच जा.क्र.335/27 आँगष्ट 2015 नुसार राजीनाम्याचे पञ विभाग नियंत्रकांकडे गेले. पुन्हा जा.क्र.336/दि.28 आँगष्ट 2015 नुसार स्वेच्छानिवृतीचे पञ आगारप्रमुख यांनी विभाग नियंत्रकांकडे पाठविले. एकाच पञास तीन कवरींग  देण्याचा अजब प्रकार केला. स्वेच्छा निवृती राजीनामा नाट्यात विभाग नियंत्रक कार्यालयाने दि.28 आँगष्ट 2015 चे पञ क्र 940 च्या टिप्पणीत चक्क दि.31 आँगष्ट 2015 असे दोन दिवस अगोदर लिहून चमत्कार केला. या चौकशीची मागणी बालाजी यांनी मुख्यमंत्री यांच्यासह परिवहन मंत्री, विरोधी पक्षनेतेे यांच्याकडे केली. याची दखल घेत परिवहन मध्यवर्ती विभागाने चौकशी सुरू केली. सदरील राजीनामा विसंगती असल्याचे लेखी देत उपोषण सोडविण्यात आले.