Tue, May 26, 2020 21:39होमपेज › Marathwada › पोलिसांच्या एनओसीनंतरच फटाके लायसन्सचे नूतनीकरण

पोलिसांच्या एनओसीनंतरच फटाके लायसन्सचे नूतनीकरण

Published On: May 06 2018 1:09AM | Last Updated: May 05 2018 10:50PMबीड ः शिरीष शिंदे

फ टाक्यांच्या साठ्याचा स्फ ोट होऊन तीन जण जागीच ठार झाल्याची दुर्घटना 27 एप्रिल रोजी आष्टी शहरात घडली होती. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून जिल्हा प्रशाससनाने महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या पुढे फ टाका साठ्याचे लायसन्सचे नूतनीकरण पोलिसांच्या ना हरकत (एनओसी) प्रमाणपत्राच्या आधारे दिले जाणार आहे. लोक वस्तीत फ टाक्यांचा साठा असेल तर त्याला परवानगी नाकारली जाणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

दिवाळीमध्ये फ टाका दुकान सुरू करण्यासाठी किंवा वर्षभर फ टाक्यांचा साठा करून विक्री करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून परवाना दिला जातो. हा परवाना दर वर्षी रिन्यू करणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी कार्यालया मार्फ त मागच्या वर्षी 151 फ टाके साठा परवाना दिला गेला आहे. 

31 मार्च नंतर सदरील परवाना रिन्यू करण्यासाठी संबंधित व्यक्‍त येतात. पहिल्यादांच फ टाके विक्री परवान्यासाठी पोलिस, महावितरण, महसूल, नगर पालिका/ग्राम पंचायत आदींचे ना हरकत प्रमाण पत्र घ्यावे लागते. त्यानंतर  त्यासाठी परवाना मिळतो. त्यानंतर मात्र लायसन्स रिन्यू करण्यासाठी केवळ 500 रुपये शुल्क आकारून परवाना दिला जातो, मात्र आता यापुढे संबंधित ठिकाणाची पाहाणी करून फ टाका साठ्याचे रिन्यू केले जाणार आहे.

केवळ 450 किलो साठ्याचीच परवानगी

फ टाके साठा करून त्याची विक्री करण्याचा अनेकांचा व्यवसाय आहे. यात्रा-उत्सव, लग्न समारंभ आदी कार्यक्रमांसाठी शोभेच्या फ टाक्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. दिवाळीच्या वेळी असणार्‍या फ टाक्यांच्या भावात व त्यानंतरच्या भावात बरीच तफ ावत असेत. त्यातून अधिक नफ ा मिळत असल्याने हा अनेकांचा व्यवसाय बनला आहे. शासनाच्या नियमानुसार केवळ 450 किलो फ टाके साठ्याचीच परवानगी दिली जाते. वास्तविकतः मोठ्या प्रमाणात शोभेच्या फ टाक्यांचा साठा केला जात असल्याचा संशय निर्माण झाला आहे. त्यामुळे यापुढे आता फ टाके नूतनीकरण लायसन्स पोलिसांच्या एनओसी नंतरच मिळणार आहे.

दोन्ही माहितीमध्ये तफावत

आष्टी येथील अल्‍ला उद्दीन यांनी 1984 मध्ये फटाके साठ्याचा परवाना घेतला होता. त्यानंतर परवान्याचे केवळ रिन्युअल झाले. अल्‍ला उद्दीन यांचे निधन झाले असून त्यांच्या नावावर हा परवाना असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकार्‍यांनी सांगितले तर स्फ ोटामध्ये मयत झालेला सर्फ राज उल्‍लाउद्दी सय्यद यांनी परवाना ट्रान्सफ र करण्यासाठी अर्ज दिल्याचे अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी सांगितले, दरम्यान या प्रकरणाची चौकशी सुरू असून अवैधरित्या फ टाक्यांचा साठा केला असल्याचे आढळून आल्यास   गुन्हा दाखल होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.

महसूलकडून पाहणी नाही

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून फ टाकेसाठी किंवा विक्रीची परवानगी दिली जाते मात्र पुन्हा महसूलकडून त्याची पहाणी केली जात नाही. विशेष म्हणजे लायसन रिन्यूअलला आल्यानंतरही शहानिशा केली जात नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलिस विभागासह महसूलकडून सबंधित ठिकाणांची पहाणी करणे आवश्यक आहे.