Mon, May 20, 2019 18:09होमपेज › Marathwada › कर्ज फे डणार्‍या शेतकर्‍यांना दिलासा

कर्ज फे डणार्‍या शेतकर्‍यांना दिलासा

Published On: Jul 09 2018 1:04AM | Last Updated: Jul 09 2018 1:04AMबीड : प्रतिनिधी

पीक कर्ज घेऊन वेळेवर फेड करणार्‍या शेतकर्‍यांना मूळ रक्कमेवरील व्याज सरकार परत करते. या योजने अंतर्गत बीड जिल्ह्यातील 42 हजार शेतकर्‍यांना पाच कोटींची आर्थिक मदत करण्यात आली आहे. या योजनेमुळे कर्ज घेऊन मुदतीत फेडण्याची धारणा शेतकर्‍यांत वाढली जात आहे.

शेतकर्‍यांना मदत व्हावी व त्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात, त्यांनी घेतलेले कर्ज वेळेवर फेडले जावे यासाठी सरकारकडून अनेक योजना राबविल्या जात आहेत. त्यातील एक म्हणजे डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना. राज्यासह देशाभरात शेतकर्‍यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणावर होत आहेत. या आत्महत्या थांबल्या जाव्यात यासाठी सरकारकडून अनेक योजना राबविल्या जातात. याच अंतर्गत शेती पिकांना हमीभाव, शेतकर्‍यांना पीक कर्ज, विहीर, मोटार-पाइपलाइनसाठी कर्ज, औजारे घेण्यासाठी कर्ज यासह कृषी विभागाकडून वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. या योजनांमुळे शेतकर्‍यांना फायदा होत आहे. 

गतवर्षी शासनाने कर्जमाफी दिली होती. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांचे मुदतीत कर्जफेड झाली नाही. असे असले तरी जिल्ह्यातील तब्बल 42 हजार 876 शेतकर्‍यांनी मात्र 30 जून अगोदर कर्जफेड केली. या शेतकर्‍यांना आता डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेमधून चार कोटी 69 लाख रुपये देण्यात आले आहेत. शेतकर्‍यांना असा व्याज परतावा मिळत असल्याने शेतकर्‍यांतून वेळेवर कर्जफेड करण्याची नियमितता पाळली जात असल्याचेही दिसून येत आहे.