Tue, Mar 26, 2019 23:57होमपेज › Marathwada › 1 लाख 11 हजार 924 ग्राहकांकडून वसुली

1 लाख 11 हजार 924 ग्राहकांकडून वसुली

Published On: Apr 12 2018 1:20AM | Last Updated: Apr 11 2018 11:53PMपरभणी : प्रतिनिधी

वीज वितरण कंपनीकडून थकबाकी वसुली मोहीम राबविण्यात आली. परभणी विभागाने  आतापर्यंत 1 लाख 11 हजार 924 ग्राहकांकडून 37 कोटी 44 लाख 1 हजार रुपये थकबाकी वसूल केली आहे. 1 लाख 11 हजार 350 ग्राहकांकडे थकबाकी असल्याने त्यांचा वीजपुरवठा खंडित केला असल्याची माहिती कार्यकारी अभियंता सूर्यकांत रानभरे यांनी दिली.महावितरणचे अधीक्षक अभियंता यशवंत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात वीजबिल वसुली मोहीम राबविण्यात आली. उपविभागनिहाय कर्मचार्‍यांच्या पथकांची नियुक्‍ती करून बिल सक्‍तीने वसूल करण्यात आले. बिलाचा नियतमत भरणा व्हावा, महावितरणचे नुकसान टळावे, ग्राहकांना वीजपुरवठा सुरळीत व्हावा, या उद्देशाने महावितरण ग्राहकांच्या सोयींसाठी थबबाकीदारांवर कारवाई करून नियमित बिल भरणार्‍यांची होणारी गैरसोय टाळण्याचा प्रयत्न करीत आहे.

विविध प्रकारच्या वीजबिल वसुलीत महावितरणने मार्चअखेरपर्यंत परभणीच्या दोन विभागांतील परभणी विभाग  क्र. 1 मधील यू. एस. डी. परभणीतील 37 हजार 977 ग्राहकांकडून 9 कोटी 73 लाख 91 हजार रुपये, आर. एस. डी. परभणीत 7 हजार 741 ग्राहकांकडून 2 कोटी 20 लाख 57 हजार रुपये, पाथरीत 6 हजार 58 ग्राहकांकडून 1 कोटी 30 लाख, पूर्णा तालुक्यात 6 हजार 845 ग्राहकांकडून 1 कोटी  70 हजार असे 58 हजार 621 ग्राहकांकडून 14 कोटी 95 लाख 4 हजार रुपये वसूल केले आहेत.

उपविभाग क्र. 2 परभणीअंतर्गत गंगाखेडमधील 7 हजार 773 ग्राहकांकडून 2 कोटी 26 लाख 62 हजार, सेलू 11  हजार 370 ग्राहकांकडून 2 कोटी 93 लाख 38 हजार रुपये, जिंतूर 11 हजार 122 ग्राहकांकडून 2 कोटी 96 लाख 66 हजार, सोनपेठमधून 2 हजार 884 ग्राहकांकडून 91 लाख 94 हजार, पालम 4 हजार 207 ग्राहकांकडून  1 कोटी 24 लाख 69 हजार रुपये, मानवत 6 हजार 644 ग्राहकांकडून 1 कोटी 24 लाख 41 हजार रुपये असे एकूण 44 हजार ग्राहकांकडून 11 कोटी 57 लाख 70 हजार रुपये वीज बिलापोटी वसूल केले आहेत. एप्रिल महिन्यातही ही मोहीम जोरात सुरू असून महिन्याच्या दहा तारखेपर्यंत महावितरणने एकूण 1 हजार 983 ग्राहकांकडून 1 कोटी 95 लाख 63 हजार रुपये थकबाकी वीजबिल वसूल केले आहे. ज्या ग्राहकांची वीजबिलाची थकबाकी येणे आहे अशा ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.1 फेब्रुवारीपासून  31 मार्चपर्यंत 1 लाख 11 हजार 350 इतक्या थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत केला आहे. त्यांच्याकडून 221 कोटी 20 लाख 69 हजार रुपये येणे बाकी आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करुन त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. 

Tags : Marathwada, Recovery, 1, lakh, 11, thousand, 924, customers