Sun, Jul 21, 2019 10:12होमपेज › Marathwada › राजकीय क्षमता ओळखून आ. क्षीरसागरांवर आरोप करावेत

राजकीय क्षमता ओळखून आ. क्षीरसागरांवर आरोप करावेत

Published On: Jan 30 2018 1:52AM | Last Updated: Jan 30 2018 1:24AMबीड : प्रतिनिधी 

शिवसंग्रामचे राजेंद्र मस्के यांनी राजकीय पात्रता, क्षमतेचे आत्मपरिक्षण करून आ.जयदत्त क्षीरसागर यांच्यावर आरोप करावेत. असा टोला कार्यकर्त्यांनी पत्रकाव्दारे लगावला आहे. 

पत्रकात म्हटले आहे, की आ. जयदत्त क्षीरसागर यांनी बीड तालुक्यातील 21 रस्ते कामांचा मुख्यमंत्री ग्रामीण सडक योजनेत समावेश करावा याबाबत पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे सातत्याने मागणी केली. आ.जयदत्त क्षीरसागर यांनी धानोरा-वरवटी-भाळवणी-लिंबागणेश या रस्त्याचा प्रस्ताव देखील दिलेला होता. याबाबत गेल्या वर्षभरापासून त्यांनी पाठपुरावा केल्याने हा रस्ता मंजूर झाला. यासोबतच मतदारसंघात 53 कोटी रुपयांची रस्त्याची कामेही मंजूर झाली. वरवटी ते पाली हा रस्ता 1.25 लाख रुपये निधी उपलब्ध झाल्यानंतर तयार करण्यात आला. आ.जयदत्त क्षीरसागर यांनी मंत्रीपदाच्या काळात करोडो रुपयांचा निधी विकासासाठी खेचून आणला आहे. राष्ट्रीय महामार्गाचे व बीड बायपासचे काम आघाडी सरकार व आ. क्षीरसागर मंत्रीपदाच्या काळातच मंजूर झाले. परंतु काम न करता श्रेय घेण्याचा प्रयत्न राजेंद्र मस्के यांनी करू नये. 

मंजुरीसाठी कोणताही पाठपुरावा न करता केवळ खोटे श्रेय घेण्याचा केवीलवाणा प्रयत्न त्यांनी करू नये असेही पत्रकात म्हटले आहे. बिंदुसरा नदीवरील पूल हा तातडीने मंजूर करण्यात यावा यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची 5 वेळा दिल्लीत भेट घेऊन हा पूल आ. क्षीरसागर यांनी मंजूर करून घेतलेला असल्याचे पत्रकात म्हटले आहे. 

आ. क्षीरसागर यांनी मंजूर करून आणलेल्या पुलाचे श्रेय घेण्यासाठी पूल पाडणीचा शुभारंभ हा नवीन स्टंट राजेंद्र मस्के यांनी केला. जनतेने ज्यांना ग्रामपंचायतमधून हद्दपार केलेले आहे अशा पत्रकबाजांपासून सावध रहावे असे आवाहन सुनील कोटुळे, सखाराम मस्के, बापू जाधव, शिवाजी येडे, धनराज टेलर, अरुण बोंगाणे, गोरख धन्ने आदींनी यात केले.

कोणाची किती ताकद हे दिसून येईल 

आ. जयदत्त क्षीरसागर हे मोठे नेते आहेत. आ. विनायक मेटे यांच्यामुळे माळापुरीची जागा मिळाले. आ. क्षीरसागर हे पालकमंत्री होते, त्यामुळे त्यांना आमच्यासाठी काम करावे लागले. तुमची एवढी ताकद होती तर तुमचा उमेदवार तिसर्‍या क्रमांकावर का गेला? तो निवडून येणे आवश्यक होते. आता परिस्थिती बदली आहे. येणार्‍या विधानसभा निवडणुकीत कोणाची किती ताकद आहे हे दिसून येईल.  लिंबागणेश सर्कलमधून आ. क्षीरसागरांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. त्या गटातील रस्ता कामांचा त्यांना एवढा विसर पडला की ते मंत्री असतानाही त्यांनी रस्ता काम केले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फ डणवीस यांच्याकडे आ. विनायक मेटे यांच्या माध्यमातून पाठपुरावा केल्यानंतर रस्ता कामासाठी 14 कोटी 64 लाखांचा निधी आम्ही आणला अशी प्रतिक्रिया शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी दिली.