Tue, Jun 25, 2019 13:34होमपेज › Marathwada › रिचार्ज शॉफ्टवरून खडाजंगी

रिचार्ज शॉफ्टवरून खडाजंगी

Published On: May 30 2018 2:19AM | Last Updated: May 29 2018 9:08PMहिंगोली : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत रिचार्ज शॉफ्ट व रिचार्ज स्ट्रेंच विहीर, बोअर पुनर्भरणच्या कामावर खडाजंगी झाली. जिल्ह्यातील कोटीच्या वर कामे रेंगाळली असताना या कामाच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्याचा ठराव घेण्यात आला.

जिल्हा परिषद अध्यक्षा शिवराणी नरवाडे यांच्या अध्यक्षतेखाली 28 मे रोजी स्थायी समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख, सभापती संजय देशमुख, भानुदास जाधव, सुनंदा नाईक यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य अजित मगर, अंकुश आहेर आदींसह गट विकास अधिकारी व सर्व विभागप्रमुखांची 
उपस्थिती होती. बैठकीमध्ये विहीर व बोअर पुनर्भरणाच्या कामावर वादळी चर्चा झाली. जिल्ह्यात झपाट्याने पाणीपातळीत घट होत असून, फेरभणास कोट्यवधीचा निधी मंजूर होऊन कामे सुरू झाली नाहीत. जिल्ह्यात रिचार्ज शॉफ्ट व रिचार्ज स्ट्रेंचची अनेक कामे मंजूर आहेत. जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने सन 2016-17 अंतर्गत रिचार्ज शॉफ्टची 139 कामे, रिजार्ज स्ट्रेंचची अनेक कामे मंजूर आहेत. जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने सन 2016- 17 अंंतर्गत रिचार्ज शॉफ्टची 139 काम रिचार्ज स्ट्रेंचची 21 कामे व सिमेंट नाला बांधची 2 कामे अशी एकूण 162 कामे प्रस्तावित करण्यात आली होती.