Wed, Apr 24, 2019 21:44होमपेज › Marathwada › गुंगीचे औषध देऊन विवाहितेवर बलात्कार

गुंगीचे औषध देऊन विवाहितेवर बलात्कार

Published On: May 18 2018 1:18AM | Last Updated: May 18 2018 12:11AMकौसडी : प्रतिनिधी 

जिंतूर तालुक्यातील कौसडी येथून जवळच असलेल्या गुळखंड फाटा येथील एका विवाहित महिलेस गुंगीचे औषधी देऊन इरळद येथील युवकाने सलग 4 दिवस बलात्कार केला. याप्रकरणी पीडित महिलेने आपल्या पतीसमवेत येऊन पोलिसांसमोर घडलेला प्रकार मांडल्यानंतर बोरी पोलिस ठाण्यात 15 मे रोजी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुळखंड फाटा येथे वास्तव्यास असलेल्या एका विवाहित महिलेस दि. 9 मे रोजी तिच्या राहत्या घरी पेढ्यामध्ये गुंगीचे औषध देऊन इरळद येथील बाबासाहेब आसाराम चव्हाण या युवकाने बेशुध्द केले होते. यानंतर त्याने महिलेस घरातून उचलून नेऊन सतत चार दिवस बलात्कार केला. यातून सदरील पीडित महिलेने युवकाच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेतली.

नंतर तिने घडलेला सर्व प्रकार आपल्या पतीला सांगितला. यानंतर या दोघांनी दि. 15 मे रोजी बोरी पोलिस ठाण्यात येऊन सहायक पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्यासमोर संपूर्ण हकिगत मांडली. यानंतर सपोनी सरोद यांनी आरोपी बाबासाहेब आसाराम चव्हाण याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. यानंतर  दि.15 मे रोजी रात्री 10 वाजता मानवत तालुक्यातील इरळद येथून आरोपी बाबासाहेब यास अटक केली. या पथकात पोलिस उपनिरीक्षक सुनील आवसरमल, जमादार गिरी यांचा समावेश होता.  आरोपी बाबासाहेब याला दि. 16 मे रोजी न्यायालयात हजर केले असता त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास स.पो.नि.गजेंद्र सरोदे हे करत आहेत.