Wed, Jan 23, 2019 17:47होमपेज › Marathwada › खांडवी गावात भोळसर महिलेवर बलात्कार

खांडवी गावात भोळसर महिलेवर बलात्कार

Published On: May 17 2018 1:27AM | Last Updated: May 16 2018 9:59PMगेवराई : प्रतिनिधी 

भोळसर असलेल्या एका 30 वर्षीय महिलेवर 60 वर्षीय नराधमाने बलात्कार केल्याची घटना खांडवी येथे घडली असून या प्रकरणी गेवराई पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंंतर आरोपीला जेरबंद करण्यात आले. दुसरी घटना धोंडराई येथे घडली. एका 15 वर्षीय मुलीस 28 वर्षीय मुलाने पुणे येथे पळवून नेले होते. त्या ठिकाणाहून या दोघांना गेवराई पोलिसांनी ताब्यात घेतल्यांनतर गुन्हा दाखल करण्यात आला.  

खांडवी येथील 30 वर्षीय भोळसर महिलेवर गावातीलच शेख बाबा कारभारी (वय 60) याने बलात्कार केला. सदरील हा प्रकार पीडित महिलेने  घरच्या लोकांना सांगितल्यानंतर महिलेच्या फिर्यादीवरून   शेख बाबा याच्या विरोधात गेवराई पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. दुसरी घटना धोंडराई येथे घडली. येथील एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीस सोलापूर जिल्ह्यातील मोहळ येथील सोमनाथ मोरे (वय 28) याने पळवून नेले होते. या प्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी या दोघांना पुणे येथून ताब्यात घेण्यात आले. पीडित मुलीच्या फिर्यादीवरून सोमनाथ शिवाजी मोरे याच्याविरोधात गेवराई पोलिस ठाण्यात पोस्को नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पो. कॉ. सागडे, पवार, बहिरवाळ यांनी केली. या दोन्ही प्रकरणाचा अधिक तपास डिवायएसपी अर्जुुन भोसले करत आहे.