होमपेज › Marathwada › आडसकरांना आमदारकीची हुलकावणी

आडसकरांना आमदारकीची हुलकावणी

Published On: Jul 06 2018 1:33AM | Last Updated: Jul 05 2018 9:09PMअंबेजोगाई : प्रतिनिधी 

राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या रमेश आडसकर यांनी कधीच आपली राजकीय इच्छा बोलून दाखवली नाही, मात्र एकदा आमदार व्हायचे असा निश्चय केलेल्या आडसकर यांनी आमदारकीसाठी त्यांनी  सतत प्रयत्न केले. राजयोगाच्या खोड्याने आडसकराना आमदारकीने सतत हुलकावणी दिल्याने नाराज आडसकर यांचे पालकमंत्री पुनर्वसन कसे करणार या चर्चेने परिसर ढवळून निघाला तरी माजलगाव विधानसभेचा  शेवटचा पर्याय खुला आहे

हाबाडा  फेम  ज्येष्ठ नेते स्व. बाबूरावजी आडसकर विधान परिषदेचे आमदार  तसेच  अंबा  कारखान्याचे चेअरमन होते. त्यांच्या राजकीय कालखंडात  आमदारकी मिळावी म्हणून सतत आग्रही असायचे मध्यंतरी आडसकर घराण्याचे राजकारणात बुरे दिन असताना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आडसकर यांनी जिल्हा परिषदेच्या सत्तेवर ताबा मिळविला. अंबा कारखाना ताब्यात घेतला राज्यात सत्ता काँग्रेस-राष्ट्रवादीची असल्याने अजित पवार यांनी बीड जिल्ह्यातील मराठा नेतृत्वाला ताकद देण्यासाठी आडसकरांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करायला लावला त्यावेळी  भंगारमध्ये गेलेला

बीड जिल्ह्या संदर्भात अजित पवार हा राजकीय निर्णय घेताना आडसकर यांची सल्लामसलत केल्याशिवाय निर्णय घेत नव्हते. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये आडसकर जिल्ह्याचे नेते झाले. पवारांच्या आदेशामुळे स्व. गोपीनाथ मुंडे च्या विरुद्ध त्यांनी बीड लोकसभा निवडणूक लढवली. चार लाखांपेक्षा जास्त मते मिळाली होती, मात्र आडसकर यांची पहिल्यापासून एकच इच्छा होती  ती म्हणजे एकदा आमदार व्हायचे. राष्ट्रवादीत असतानाही अनेक वेळा आमदारकीसाठी प्रयत्न केला यश आले नाही. आडसकर राजकारणात एवढे धूर्त आहेत की आगामी काळात सत्ता कोणत्या पक्षाची येणार आहे त्याच पक्षात ते प्रवेश करतात.

गेल्या विधानसभा निवडणुकी अगोदर भाजपमध्ये प्रवेश झाला त्यावेळी त्यांना पत्रकारांनी प्रवेश करण्या मागचा उद्देश विचारला असता आपला कुठलाही उद्देश किंवा स्वार्थ नसून ताईचे नेतृत्वाखाली जे काम मिळेल ते घ्यायचे, यासाठी आपण प्रवेश केला असल्याचे त्यांनी सांगितले, मात्र काही दिवसांत विधानसभेच्या निवडणुका लागल्या माजलगाव मतदार संघात 70 टक्के धारूरचा भाग असल्याने आडसकर यांनी उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न केले तेही प्रयत्न यशस्वी न झाल्यामुळे पुन्हा अंबा कारखान्याची वाट धरली.  जिल्हा परिषदेच्या राजकारणात स्थिर होण्यासाठी ते स्वतः व ऋषीकेश आडसकर दोघेही काका पुतणे वेगवेगळ्या जिल्हा सर्कल मध्ये उमेदवार म्हणून उभे राहिले भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आडस कराची राजकारणात पकड मजबूत होऊ नये यासाठी हातभार लावला अपेक्षेप्रमाणे आडसकर काका-पुतण्याचा पराभव झाला.

कार्यकर्ते झाले पुन्हा नाराज

जिल्हा परिषद निवडणुकीत ते स्वतः पराभूत झाले तरी त्यांच्या कोट्यातून त्यांचे व्याही काँग्रेसचे राजेसाहेब देशमुख यांना शिक्षण सभापती बनवले जिल्हा परिषदेची सत्ता पालकमंत्र्यांच्या ताब्यात आणून देण्यात आडसकर यांच्या सिंहाचा वाटा आहे. त्याचे बक्षीस म्हणून विधान परिषदेत राज्यपाल कोट्यातील जागेवर आमदारकीसाठी आडसकर यांचे नाव पालकमंत्री पाठपुरावा करून मिळवून देतील अशी अपेक्षा होती. भाजपच्या वाट्याला आलेल्या पाच जागेवर उमेदवार जाहीर केले त्यात रमेश आडसकर यांचे नाव नसल्याने समर्थकांत नाराजी पसरली आहे. त्यामुळे आता आडसकराची महामंडळावर वर्णी लावणे अथवा माजलगावचे आमदार प्रकृती अस्वास्थ्यामुळे मतदारसंघात लक्ष देऊ शकत नाहीत. आडसकर यांनी माजलगावसाठी यापूर्वीही तयारी केली होती पुन्हा एकदा माजलगाव विधानसभेसाठी रमेशराव आडसकर यांना संधी मिळू शकते अशी चर्चा आहे.