पावसाने मतदान केंद्रांना गळती....

Last Updated: Oct 20 2019 9:00PM
Responsive image

Responsive image

परंडा : प्रतिनिधी  

रविवारी झालेल्या पावसामुळे परंडा विधानसभा मतदार संघातील शहरातील एक व सोनारीतील दोन मतदान केंद्रांना गळती लागली आहे. पत्र्यातून गळत असलेल्या पाण्यामुळे ठिकाणी पाणी साचले आहे. यामुळे मतदानासाठी वापरण्यात येणाऱी इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे पाण्यात भिजण्याची शक्यता नाकरता येत नाही.

परंडा शहराला व तालुक्यात सायंकाळी पावसाने झोडपून काढलं आहे. त्यामुळे शहरातील मतदान केंद्र ३१७ विविध कार्यकारी सोसायटीमध्ये पत्रे गळके असल्याने पाणी गळती होत असल्याने मतदान अधिकाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याच बरोबर कर्मचाऱ्यांसाठी शौचालयची सोय सुध्दा नाही.

तालुक्यातील सोनारी येथे मुसळधार पावसामुळे मतदान केंद्रांमध्ये मतदान केंद्रामध्ये गळत असल्यामुळे केंद्रात पूर्णपणे  पाणी साचले होते. सोनारी येथे दोन मतदान केंद्र असून दोन्ही केंद्राचे अशी अवस्था बिकट झाली आहे. मतदान केंद्रात पाणी साचल्याने कर्मचाऱ्यांचे हाल होत आहे.