Tue, Jul 16, 2019 22:25होमपेज › Marathwada › आवारेचा पंतप्रधानांकडून सन्मान

आवारेचा पंतप्रधानांकडून सन्मान

Published On: May 03 2018 1:30AM | Last Updated: May 02 2018 10:54PMपाटोदा : प्रतिनिधी

राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता पाटोद्याचा सुपुत्र पैलवान राहुल आवारेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले. दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुलचे अभिनंदन करताना त्याने घेतलेल्या कष्टाचे, मेहनतीचे कौतुक केले. ग्रामीण भागातून आलेल्या राहुलचे यश इतर खेळाडुंसाठी प्रेरणादायी आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. येत्या ऑलम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवण्यासाठी त्याला शुभेच्छा दिल्या. यावेळी केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड आणि इतर अधिकारीही उपस्थित होते.

तसेच मुंबईत ‘मातोश्री’ वर झालेल्या कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व सेना उपनेते आ. तानाजी सावंत याच्या उपस्थितीत राष्ट्रकुल विजेता राहुल आवारेचा 11 लाख रुपये देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी सुरेश कांबळे, विशाल देवकर, पै. शरद पवार, आप्पा कारंडे, चेतन पाटील, अजमेर मुलाणी, सुहास गोडगे, उदय शेळके उपस्थित होते.

Tags : Rahul Awara, Prime Minister Narendra Modi, Shiv Sena Chief Uddhav Thackeray, praised,