Wed, Nov 21, 2018 13:15होमपेज › Marathwada › 'पद्मावत'विरोधात नांदेडमध्ये बसची तोडफोड

'पद्मावत'विरोधात नांदेडमध्ये बसची तोडफोड

Published On: Jan 25 2018 6:17PM | Last Updated: Jan 25 2018 6:17PMनांदेड : प्रतिनिधी

'पद्मावत' चित्रपटच्या विरोधात करणी सेनेने पुकारलेल्या बंदला शहरातील काही भागात चांगला प्रतिसाद मिळाला. अज्ञात समाज कंटकांनी कौठा भागात एस.टी.बसवर दगडफेक करण्याचा प्रकार देखील घडला. 

संजय लिला भन्साळी दिग्दर्शित 'पद्मावत' चित्रपट गुरुवारी देशभरात प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला करणी सेनेने तीव्र विरोध केला असून देशभरात बंद व आंदोलने करण्यात येत आहेत. 
नांदेड शहरातील हबीब टॉकीज ते महावीर चौकापर्यंत व्यापारपेठ बंद होती. जुना कौठा भागात दुपारी एका बसवर अज्ञात समाजकंटकांनी दगडफेक करुन काचा फोडल्या. शहरातील राजपूत संघर्ष समितीने या बंदला पाठिंबा दिला आहे. पद्मावत चित्रपट प्रदर्शित केला जाऊ नये, अशी मागणी राजपूत संघर्ष समितीने केली होती.