Tue, May 21, 2019 18:09होमपेज › Marathwada › तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांची उपासमार

तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांची उपासमार

Published On: Apr 12 2018 1:20AM | Last Updated: Apr 11 2018 11:45PMहिंगोली : प्रतिनिधी

राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयांतील उच्च शिक्षित तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना नियुक्ती आदेश नऊ महिन्याचा, दाम मात्र सहा महिने अन् वर्षात एकदाच दाम ते ही अनिश्‍चित असल्याने प्राध्यापकांची उपासमार होत आहे. प्राध्यापकांना मानधनात तफावत असल्याने शिक्षणमंत्र्यानी विधानपरिषदेत प्रश्नोत्तरांच्या तासा दरम्यान मानधन वाढीचा प्रस्ताव अर्थमंत्रालयात असुन लवकरच मंजुरी मिळेल असे सांगितले. सरकारने अर्थसंकल्पात मंजुर केले नसल्याने मानधन वाढीची शिक्षणमंत्र्याची बनवाबनवी उघड झाली आहे.  

राज्यातील प्राध्यापकांच्या रिक्त असलेल्या जागांवर तासिका तत्वावर काम करणााय प्राध्यापकांचा मानधनाचा तिढा यंदाही सुटलेला नाही. 250 रुपयाच्या तुटपुंज्या मानधनावर काम करणार्‍या या प्राध्यापकांच्या मानधन वाढीचा प्रस्ताव अर्थसंकल्पात मंजुर करण्यात आलेला नाही. मराठवाड्यात मागील 15 वर्षापासुन तासिक तत्वावरील प्राध्यापक शैक्षणिक  गाडा हाकत आहेत. या तासिका प्राध्यापकांना प्रति तासिका मानधन देण्यात येते. उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडुन यासाठी मानधन निश्चित करण्यात आले असुन, पारंपारीक आणी तत्सम कॉलेजमध्ये प्राध्यापकांना 250 रुपये प्रति तासिका मानधन देण्यात येते. तंत्रनिकेतन कॉलेजसाठी 500 रुपये तर व्यवसायीक अभ्यासक्रमाच्या कॉलेजमधील प्राध्यापकांना प्रति तासिका 800 रुपये मानधन दिले जाते. त्यामुळे पारंपारीक कॉलेजमधील प्राध्यापकांना दिले जाणारे मानधन वाढवावे अशी मागणी वित्त विभागाकडे केली होती. 

अनेक वर्षापासुन हा प्रस्ताव वित्त विभागाकडे सुपूर्त करण्यात आला आहे. यंदा उच्च शिक्षण मंत्र्यांनी मानधन वाढीचे आश्वासन  विधान परिषदेत दिले असतांना अर्थमंत्रालयाने मात्र मंजुरी दिली नसल्याने मानधनाचा तिढा सुटलेला नाही.  प्राध्यापकांना नियुक्ती नऊ महिन्याची दिली जाते. यात परिक्षा कालावधी व सुट्या वगळुण साधारण सहा महिन्याचे वेतन दिले जाते. यात देखील मानधनाची हमी नाही. यामुळे तासीका तत्वावरील प्राध्यापकांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे. 

Tags : Marathwada, Proposals,  increasing, profits,  professors, approved,  budget