Sun, Jul 21, 2019 15:14
    ब्रेकिंग    होमपेज › Marathwada › बनावट डिग्रीवर पदोन्नती

बनावट डिग्रीवर पदोन्नती

Published On: Apr 06 2018 2:21AM | Last Updated: Apr 06 2018 1:25AMपरभणी : प्रतिनिधी

महाराष्ट्र कृषी विद्यापीठ अधिनयिम 1983 चे उल्लंघन करून विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक दत्तात्रय गंगाधर दळवी यांनी कृषी वनस्पती शास्त्र या पदावर पदोन्‍नती मिळवून प्रशासनाची दिशाभूल केली असल्याचा आरोप  गोदावरी शिवाजी पवार यांनी राज्यपालांकडे केला आहे. कृषीक  विद्यापीठातील अभ्यासक्रमाची पदवी अकृषिक विद्यापीठास देता येत नाही असे आरोपकर्तेे पवार यांचे म्हणणे आहे. पदवीधारक दळवी यांनी  मिळवलेली  पदोन्‍नती  रद्द करावी अशी मागणी केली आहे. 

येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात डॉ.दत्तात्रय गंगाधरराव दळवी हे कार्यरत आहेत. त्यांना विद्यापीठाच्या कुलसचिवांनी आचार्य पदवी (पी.एच.डी.) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा या अकृषिक विद्यापीठातून मिळविण्यास परवानगी व नाहरकत प्रमाणपत्र दिले. वनस्पती शरीरक्रिया शास्त्र या विषयात पीएच.डी. करण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र देऊनही दळवी यांनी स्वारातीम विद्यापीठ नांदेड येथे वनस्पतीशास्त्र (बॉटनी) या विषयाची नोद केली.  वनस्पती शास्त्र या विषयात विज्ञान शाखेत पी.एच.डी. स्वारातीममध्ये केली असल्याची माहिती डॉ.व्ही.एस.हुडगे यांनी दिली आहे. परंतु दळवी यांनी कृषी वनस्पतीशास्त्र या विषयात बोगस आचार्य पदवी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाकडून प्राप्‍त करून घेतली. युजीसीच्या नियमान्वे वनस्पती शास्त्र विषयाची पदवि विद्यापीठाकडून दिल्या जात नाही. ज्या विषयात नोंद केलेली असते त्याच विषयात पदवी प्राप्‍त करने अनिवार्य असते. महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये कृषी वनस्पतीशास्त्र ही पदवी असते. परंतु दत्तात्रय दळवी यांनी कृषी वनस्पतीशास्त्र या विषयावरील आचार्य पदवी अकृषिक असलेल्या स्वा.रा.ती.म.मधून आणली कशी हा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. स्वामीरामानंद तीर्थ विद्यापीठात कोणतीही कृषी विद्या शाखा कार्यरत नाही. विद्यापीठाने अद्यापपर्यंत एकाही विद्यार्थ्यास कृषी वनस्पती शास्त्र या विषयात पदवी प्रदान केली नाही. 
 तसे आदेशही विद्यापीठाने दिले नसल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे, परंतु दळवी यांनी ते कार्यरत असलेल्या विभागात मात्र दाखल करताना कृषी वनस्पती शास्त्राची अन् तेही स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने दिलेली पदवी वनामकृवित देऊन पदोन्‍नती मिळविले आहे. 1983 च्या अधिनियमान्वे अकषिक विद्यापीठांना कृषी पदवी  प्रदान करण्याची अनुमती नाही. असे असतानादेखील दत्तात्रय दळवी यांनी बोगस डिग्री तयार करुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे प्रशासनाने दत्तात्रय दळवी यांच्यावर कारवाई करून त्यांची करण्यात आलेली पदोन्नती त्वरित रद्द करावी अशी मागणी गोदावरी शिवाजी पवार यांनी निवेदनात केली आहे.