Wed, Apr 24, 2019 19:29होमपेज › Marathwada › कारागृहात कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न

कारागृहात कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Published On: Jan 06 2018 1:25AM | Last Updated: Jan 05 2018 9:33PM

बुकमार्क करा
बीड : प्रतिनिधी

चोरी, दरोडा, बलात्कार यासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या अंबाजोगाई येथील मोहन दौलत मुंडे याने बीडच्या कारागृहात स्वतःच्या पोटावर जखमा करून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी गुरुवारी रात्री शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहन मुंडे मागील काही महिन्यांपासून जिल्हा कारागृहातील बराक क्र. 7 मध्ये कैदेत आहे.

तीन दिवसांपासून नातेवाईक आलेले असूनही मला त्यांची भेट घेऊ दिली जात नाही, असे म्हणत त्याने कारागृहातील शौचालयात जाऊन डाव्या हातावर, डोक्याच्या समोरच्या भागावर आणि पोटावर कुठल्या तरी वस्तूच्या साह्याने इजा करून घेतली. जखमी अवस्थेत त्याला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. याप्रकरणी पोलिस शिपाई कानडे यांच्या फिर्यादीवरून मोहन मुंडे याच्यावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.