Wed, Apr 24, 2019 19:29होमपेज › Marathwada › अभियांत्रिकीच्या तुलनेत आय.टी.आय.ला प्राधान्य

अभियांत्रिकीच्या तुलनेत आय.टी.आय.ला प्राधान्य

Published On: Jun 08 2018 1:23AM | Last Updated: Jun 08 2018 12:20AMपरभणी ः प्रतिनिधी

शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्थेत विविध ट्रेडचे प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील गुणवत्ताधारक 66 विद्यार्थ्यांची निवड नामांकित कंपनीत झाली आहे. अभियांत्रिकी पदवी, पदविकेस उत्तम पर्याय म्हणून आय.टी.आय.कडे पाहिल्या जात असल्याने आय.टी.आय. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना चांगले दिवस आले आहेत. 

येथील जिंतूर रोडवर असलेल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कारपेंटर, सिव्हिल ड्रॉटसमन, मेकॅनिकल ड्रॉटसमन, इलेक्ट्रेशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, फिटर, मशिनिस्ट, मशिनिस्ट ग्राइंडर,मेकॅनिक मोटार, मशीन रेफ्रिजेशन, ट्रॅक्टर मेकॅनिक, ऑटोबॉडी रिपेअर मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, पेंटर, पीओपी, पंप ऑपरेटर, सेव्हिंग टेक्नॉलॉजी, स्टेनोग्राफर, सर्व्हायर, टर्नर, वेल्डर, वायरमन या ट्रेडचे प्रशिक्षण दिल्या जाते. सद्यःस्थितीला 860 विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. प्रशिक्षितांसाठी दरवर्षी रोजगार मेळावा आयोजित करून देशातील विविध कंपन्यांमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाते. 22 मे रोजी आय.टी.आयमधील प्रशिक्षणार्थींचा रोजगार मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात मर्सडीज, हॅनीहेल, टरबोट फॉलोनी, बी.एस.ग्रुप या कंपन्या सहभागी झाल्या होत्या. या मेळाव्यात  एकूण 66 प्रशिक्षणार्थींची निवड करण्यात आली. प्रत्येक ट्रेडसाठी अ‍ॅप्रेंटिस ही अनिवार्य आहे. यासाठी 265 कंपन्यांना औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून बोलविण्यात येते. 

यासाठी कंपन्यांना ऑनलाइन रजिस्ट्रेशन करावे लागते. इच्छुक विद्यार्थ्यांनीही नोंदणी करणे महत्त्वाचे आहे. अलीकडील काळात पदवी व पदविकांऐवजी आय.टी.आय. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्राकडून अधिक प्रतिसाद देण्यात येत असल्याने आय.टी.आय.च्या विद्यार्थ्यांना चांगले दिवस येत आहे. 

आय.टी.आय. च्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी अ‍ॅपे्रेंटिस महत्त्वाची असते. कंपन्यांकडून आयटीआय विद्यार्थ्यांची मागणी वाढत आहे. औद्योगिक क्षेत्रात कौशल्यप्राप्तीला अनन्यसाधारण महत्त्व असून प्रत्येक विद्यार्थ्यांनी तो मिळविण्याचा प्रयत्न करायला हवा. पदवी व  पदविकेच्या तुलने आयटीआयचे विद्यार्थी तंत्रयंत्र ज्ञात कौशल्य प्राप्त असतात. यामुळे लवकरात लवकर औद्योगिक क्षेत्रात कार्य करण्यास तत्पर राहू शकतात.  -डी.एन. मोरे, गट निदेशक, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, परभणी