अंबाजोगाई : रवी मठपती
पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्रांशी संवाद साधनार आहेत. थेट पंतप्रधानांशी व्हिडिओ कॉनफरन्सद्वारे संवाद साधण्याची या निमित्ताने छात्रांना संधी प्राप्त झाली आहे.
राष्ट्रीय छात्र सेनेत तालुक्यातील छात्र मोठ्या संख्येने आहेत. केंद्र सरकारकडून राष्ट्रीय कॅडेट कोअर (एनसीसी) या संघटनेच्या 13 लाख कॅडेट्सचे मोबाइल क्रमांक आणि ई-मेल, वर्ष इत्यादी माहिती मागवण्यात आली आहे. पंतप्रधान या माहितीद्वारे या कॅडेट्सशी संवाद साधणार आहेत.
सध्या अशा स्वरुपाची लाखो कॅडेट्सची माहिती त्या त्या बटालियन ऑफिसर व संबंधित अधिकारर्यांकडून एनसीसीने गोळा केली आहे. ही संपूर्ण प्रक्रिया याच पंधरवड्यात पूर्ण करण्यात आली आहे. अद्याप पंतप्रधानांसोबत या विद्यार्थ्यांशी संवादाची तारीख निश्चित करण्यात आलेली नसून ही तारिख पंतप्रधानांच्या वेळे आणि सोयीनुसार निश्चित होणार आहे.दिल्ली येथील राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रमुख लेफ्टनंट जनरल बी. एस. सेहरावत (एनसीसी) यांनी यासंदर्भात 23 फेब्रुवारी रोजी सर्व राज्यातील विभागीय कार्यालयांना अधिकृत पत्र पाठवून सूचना दिल्या आहेत.
Tags : Marathwada, Marathwada News, Prime Minister, will interact, NCC students