हिंगोली : प्रतिनिधी
लंडन येथे पंतप्रधानांनी भारतीय डॉक्टरांविरुद्ध जे अनुद्गार काढले त्याबद्दल आयएमए हिंगोली यांच्या वतीने पंतप्रधानांचा धिक्कार करण्यात आला.
लंडन येथे पंतप्रधानांनी भारतीय डॉक्टरांविरुद्ध जे अनुद्गार काढले ही बाब मोठ्या लोकशाहीच्या प्रमुखास निश्चितच शोभनीय नसल्याने या संदर्भात आयएमए हिंगोली यांनी बैठक बोलावून त्यात पंतप्रधानांचा जाहीर निषेध केला. आयएमए ने जेर्नेरिक औषधांचा नेहमीच आग्रह धरलेला आहे. मुख्यालयीन देखील सदर औषधांचे दुकान आहे. एक कंपनी एक औषध आणि एकच किंमत यासाठी आयएमएतर्फे सातत्याने पाठपुरावा केला जात असताना शासन त्यास दाद देत नाही.
स्टेंटच्या किमती नियंत्रणात ठेवणे आणि रुग्णास स्टेन्ट निवडण्याचे स्वतंत्र्य असावे यासाठी आयएमए प्रयत्नशील असताना पंतप्रधानांनी अशी संबंध लोकप्रतिनिधीसाठी केलेली शेरेबाजी प्राथमिक डॉक्टरांसाठी मानहानीकारक तर आहेत त्याचबरोबर डॉक्ट-रुग्ण सुसंवादासाठी अडसर वाढवणारी देखील आहे. लंडन येथील कार्यक्रमासाठी दिलीप संघवी यांनी 1 हजार लक्ष रुपयापेक्षा जास्त खर्च केला आहे. औषध कंपनीच्या नक्की फायदा कोणाला, त्यातूनच पंतप्रधानांचा दुप्पटीपणा यामुळे अधोरेखीत होतो. त्यामुळे आयएमएतर्फे पंतप्रधानांचा जाहीर निषेध नोंदविण्यात आला. यावेळी डॉ. जयदीप देशमुख, डॉ. स्नेहल नगरे, डॉ. आशुतोष माहूरकर, डॉ. राशी कंदी, डॉ.रामनिवास काबरा आदी उपस्थित होते.