Tue, Jul 16, 2019 21:48होमपेज › Marathwada › शुल्क भरण्यासाठी महाविद्यालयांचा विद्यार्थ्यांवर दबाव!

शुल्क भरण्यासाठी महाविद्यालयांचा विद्यार्थ्यांवर दबाव!

Published On: Feb 06 2018 1:47AM | Last Updated: Feb 05 2018 9:55PMपरभणीः प्रतिनिधी 

मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या विविध प्रकारच्या शैक्षणिक शिष्यवृत्ती वाटपात तांत्रिकरीत्या व्यत्यय आणून मागासवर्गीय विद्यार्थ्यांची चेष्टा केली जात असल्याचा आरोप  विद्यार्थ्यांनी केला आहे. महाविद्यालयातून शुल्क भरणा करण्यासाठी दबाव वाढत असल्याने सोमवारी  परभणीतील शिवाजी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीच्या मुद्यावर प्रश्‍न उपस्थित करुन शासनाची मागासवर्गीयांच्या शिष्यवृत्ती संदर्भातील कुटनीती समोर आणली.

शुल्क भरा व त्यानंतरच परिक्षेला बसा असे फर्मान महाविद्यालयाने काढलेे. यामुळे अनेकांवर परिक्षेला अनुपस्थित राहण्याची वेळ आली.   महाविद्यालयाच्या सततच्या दमदाटीला कंटाळून विद्यार्थ्यांनी शुल्क भरणा व शिष्यवृत्तीसाठी शासनाकडे अनेकवेळा पाठपुरावा केला.  वर्ष संपत आले तरी एक रुपयाही विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा झाला नाही. ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी दीडशे ते दोनशे रुपये खर्च झालेला आहे. परंतु शासनाने पुन्हा या प्रणालीत बदल घडवून ती ऑफलाईन केल्याचे जाहीर केले आहे. यासाठी कॅम्पच्या माध्यमातून अर्ज भरुन घेण्याची मोहीम समाजकल्याण विभागाच्या वतीने सुरु आहे. 9 फेब्रुवारी ही विद्यापीठाची परीक्षा शुल्क भरण्याची अंतीम तारीख आहे.  मात्र  शिष्यवृत्ती न मिळाल्याने अनेकांना परिक्षेला मुकण्याची वेळ आली आहे.  डीबीटीवर ऑनलाईन  फॉर्म भरला असताना ऑफलाईन फॉर्म का? प्रश्‍न विद्यार्थ्यांनी केला आहे.