होमपेज › Marathwada › जिल्हा प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात 

जिल्हा प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात 

Published On: May 17 2018 1:27AM | Last Updated: May 16 2018 9:58PMबीड : प्रतिनिधी 

बीड-लातूर-उस्मानाबाद विधान परिषदेची निवडणूक अंतीम टप्प्यात आली असून जिल्हा प्रशासनाच्यावतीने मतदान केंद्रासाठीची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. बीड जिल्ह्यातील 11 मतदान केंद्रावर मतदान होणार असून 355 मतदार आपला मतदानाचा हक्‍क बजावणार आहेत, दरम्यान शनिवारपासून प्रचार संपुष्टात येणार आहे.बीड-लातूर-उस्मानाबाद विधान परिषदेची निवडणुकीसाठी दाखल केलेला अर्ज मागे घेण्याची तारीख 7 मे होती. त्यानंतर प्रचाराला सुरुवात झाली. भाजपचे उमेदवार माजी आ. सुरेश धस व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अशोक जगदाळे यांनी अंर्तगत गाठीभेटींवर भर दिला आहे. बीड-लातूर-उस्मानाबाद या तिन्ही जिल्ह्यात फि रत हे दोन्ही उमेदवार मतदारांची गोळाबेरीज करण्यात व्यस्त आहे.  

उस्मानाबाद येथे होणार मतमोजणी

बीड-लातूर-उस्मानाबाद विधान परिषदेसाठी 21 मे रोजी जिल्ह्यातील 11 केंद्रावर सकाळी 8 ते 4 या वेळेत मतदान होणार आहे. 11 तालुुक्यात 11 तहसीलच्या ठिकाणी मतदान होईल. त्यानंतर लागलीच सर्व मतपेट्या उस्मानाबाद येथे नेण्यात येतील. 24 मे रोजी मतमोजणी होणार असून लगेचच निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मतदान पत्रिकेवर मतदारांना मतदान करावे लागणार आहे. तिन्ही जिल्ह्यातील मतदान चिठ्ठ्या उस्मानाबाद येथे एकत्रित करून त्याची मोजणी केली जाणार आहे.

बीड जिल्ह्यातील पुरुष-स्त्री मतदार 

जिल्हा परिषद बीड (54), नगर पालिका बीड (55), नगर पालिका गेवराई (22), नगर पालिका माजलगाव (28), नगर पालिका अंबाजोगाई (33), नगर पालिका परळी (37) नगर पालिका धारुर (20), नगर पंचायत वडवणी (19), नगर पंचायत केज (19), नगर पंचायत शिरूर (19), नगर पंचायत पाटोदा (19), नगर पंचायत आष्टी (19) व पंचायत समिती सभापती (11) अशी बीड जिल्ह्यातील स्त्री व पुरुष मतदारांची संख्या आहे.

त्या मतदारांच्या निर्णयाकडे लक्ष

जिल्हा परिषदेच्या सहा सदस्यांच्या अपात्रते प्रकरणी बुधवारी सुनावणी होणार होती, मात्र सांयकाळपर्यंत त्यावर कोणताही निर्णय झाला नाही. बहुदा या प्रकरणावर गुरुवारी निर्णय होईल. सहा सदस्य मतदानास पात्र ठरले तर जिल्हा परिषदेच्या सदस्य मतदारांची संख्या 60 असेल. जर निर्णय त्यांच्या विरोधात गेल तर 54 मतदार मतदानास पात्र असतील हे उघडच आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मतदारांचा आकडा 361 होईल.