Wed, Jun 26, 2019 17:44होमपेज › Marathwada › जुन्या वादातून पोलिस कर्मचार्‍याची हत्या

जुन्या वादातून पोलिस कर्मचार्‍याची हत्या

Published On: Feb 04 2018 2:45PM | Last Updated: Feb 04 2018 2:13PMनांदेड : प्रतिनिधी

जुन्या रागातून एका पोलिस कर्मचाऱ्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. दत्तनगर भागात आज (रविवारी) सकाळच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली.  शिवाजी नगर पोलिस ठाण्याचे कर्मचारी शिवाजी शिंदे असे या मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, दत्तनगर भागात राहणारे शिवाजी शिंदे हे नगर पोलिस ठाणे अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत होते. गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या तुलजासिंह ठाकुर यास शिंदे यांनी एका प्रकरणात अटक केली होती. याचाच राग मनात धरत आज सकाळी शिंदे कपडे इस्त्री करण्यासाठी दुकानावर गेले असता, तुलजासिंह याने पाठीमागून येवून त्यांच्या डोक्यात  घातला. शिंदे खाली पडले असता तुलजासिंह यांने त्यांचे डोके दगडाने ठेचले. यात शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला.

तर, तुलजासिंह ठाकुर याने घटनास्थळापासून पळ काढला. आरोपीच्या शोधासाठी दोन पोलिसांचे पथके रवानगी करण्यात आली आहेत. या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक शिदे, उपविभागीय पोलिस अधिकारी  फटके व शिवाजी नगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नरवाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली