Thu, Apr 25, 2019 16:16होमपेज › Marathwada › गोळी लागून पोलीस कर्मचारी जखमी 

गोळी लागून पोलीस कर्मचारी जखमी 

Published On: Feb 03 2018 8:09AM | Last Updated: Feb 03 2018 8:09AMजळगाव : प्रतिनिधी

चोपडा येथे पेट्रोलिंगसाठी निघालेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या ताब्यातील रायफलमधून गोळी सुटल्याने एक पोलिस कर्मचारी जखमी झाला. ही घटना शुक्रवारी (2 फेब्रुवारी) रात्री घडली. या घटनेमुळे पोलीस वर्तुळात मोठी चर्चा होती.

याबाबत माहिती अशी, चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्याचे कर्मचारी उमेश धनगर हे दुचाकीवरून चोपडा ग्रामीणमध्ये गस्त घालत होते. यावेळी त्याच्या खांद्याला असलेल्या रायफलमधून अचानक गोळी सुटली. यात ते जखमी होवून एका शेताच्या रस्त्याच्या कडेला पडल्याचे काहींना आढळल्यानंतर त्यांना चोपडा शहरातील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

सुदैवाने रायफलची गोळी त्यांच्या खांद्याला लागल्याने मोठा अनर्थ टळला. जखमी पोलिस धनगर यांच्या उपचार सुरू असून त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र नेमकी घटना कशी व किती वाजेच्या सुमारास घडली याबाबत माहिती मिळालेली नाही. घटनेची माहिती कळताच चोपडा पोलीस उपअधीक्षक सदाशिव वाघमारे, पोलीस निरीक्षक किसनराव नजन-पाटील व अन्य अधिकार्यांनी धाव घेत माहिती जाणून घेतली.