Wed, Feb 19, 2020 09:22होमपेज › Marathwada › बिलोली : नगराध्यक्षा कुलकर्णीना दोन दिवसाची पोलिस कोठडी

बिलोली : नगराध्यक्षा कुलकर्णीना दोन दिवसाची पोलिस कोठडी

Published On: Dec 04 2017 8:33PM | Last Updated: Dec 04 2017 8:33PM

बुकमार्क करा

बिलोली : प्रतिनिधी

बिलोली नगर परिषदेच्या नगराध्यक्षा मैथिली कुलकर्णी यांना बिलोली न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कस्टडी सुनावली. नगरपालिकेच्या कामामध्ये भ्रष्टाचार  प्रकरणात कुलकर्णी यांनी आज (सोमवारी) बिलोली कोर्टात शरणागती पत्कारल्याने न्यायालयाने त्यांना ही शिक्षा ठोठावली. 

बिलोली नगरपरिषदेत २०१२-२०१३ मध्ये शहरात कामे न करताच जवळपास १ कोटींचा भ्रष्टाचार झाला होता. नगराध्यक्षा सौ.मैथिली कुलकर्णी , तत्कालीन मुख्याधिकारी अजित डोके, लेखापाल शंकर जाधव, कारकून ए. जी.कुरेशी, सल्लागार कंत्राटी अभियंता भास्कर शिंदे यांनी संगनमतने रवींद्र नगर शेजारील सागर नरोड यांच्या प्लॉट मध्ये सिमेंट रस्ते, प्रवास न करता प्रवास भत्ता उचलने, शहरातील सिमेंट रस्त्यावर मुरूम टाकणे व मुरूम टाकण्यासाठी बोगस मजुर दाखवून बिलं उचलने अश्या अनेक कामात भ्रष्टाचार केला होता. या प्रकरणी माजी/आजी नगरसेवक व आरटीआय कार्यकर्ता शे.जाकेर यांनी पुराव्यानिशी न्यायालयात याचिका दाखल केली होती.

या प्रकरणात नगराध्यक्षासह इतर सर्वांनी बिलोलीच्या कनिष्ठ न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, सर्वाच न्यायालयाने हा जामीन अर्ज फेटाळला. या प्रकरणातील कारकून कुरेशी व अभियंता शिंदे यांना आधीच न्यायालयीन कोठडी दिली आहे. तर सर्वोच्च न्यायालयाने जमीन फेटाळताच आज (सोमवारी) बिलोली न्यायालयात शरणागती पत्कारली असून नगराध्यक्षाना न्यायालयाने त्यांना दोन दिवसांचा पोलिस कस्टडी सुनावली.