Thu, Jul 18, 2019 10:10होमपेज › Marathwada › पोलिस कर्मचार्‍यास एक वर्ष कारावास 

पोलिस कर्मचार्‍यास एक वर्ष कारावास 

Published On: Apr 10 2018 1:15AM | Last Updated: Apr 10 2018 12:39AMपाथरी : प्रतिनिधी

घराचे बांधकाम व दुचाकी खरेदीसाठी माहेरावरून 5 लाख रूपये आणण्याची बेकायदेशीर मागणी करून पत्नीस क्रूर वागणूक दिल्याप्रकरणी दोषी ठरवून न्यायालयाने पोलिस शिपाई शेख अब्दुल मुश्ताक यास 1 वर्ष कारावास व 5 हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डॉ. त.न.कादरी 7 एप्रिलला निकाल दिला. 

पाथरी येथील सुमय्या बेगम हिचे लग्न 15 जुलै 2012 रोजी शेख अब्दुल मुश्ताक यांच्यासोबत झाले होते. लग्नानंतर 3 महिन्यांनी पती व सासरच्या मंडळींनी पैशासाठी तिचा छळ सुरू केला. घराचा वरचा मजला बांधण्यासाठी तसेच दुचाकी खरेदी करण्यासाठी 5 लाखाची मागणी करण्यात आली. पैसे मिळत नसल्याने शारिरिक व मानसिक छळ करून सदर विवाहितेला घराबाहेर काढण्यात आले. अशी तक्रार तिने 22 जानेवारी 2013 रोजी पाथरीच्या महिला समुपदेशन केंद्रात तक्रार दाखल केली होती. परंतु तिचा पती पोलिस असल्याने स्थानिक पोलिसांनी कारवाई केली नाही, असा आरोप करीत या विवाहितेेने 4 मार्च 2013 रोजी पाथरी न्यायालयात दाद मागितली.

त्यावर न्यायालयाने पोलिसांना आदेशित करून गुन्ह्याचा तपास करण्यास सांगितले. त्यामुळे आरोपी शेख अब्दुल मुश्ताक याच्याविरूद्ध गुन्हा नोेेंदवून पाथरी पोलिसांनी गुन्हा नोंद केला. तपास करून 6 डिसेंबर 2013 रोजी आरोपीविरूद्ध कलम 498 अ भादंविनूसार न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले. सदर प्रकरणात सरकारी वकिल डी.आर. काठुळे यांनी एकूण 6 साक्षीदार तपासले. त्यांची साक्ष व सरकारी वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपी शेख अब्दुल मुश्ताक यास दोषी धरून 1 वर्ष सश्रम कारावास व 5 हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. तसेच सदर दंडाच्या रक्कमेपैकी 4 हजार रूपये नुकसान भरपाई म्हणून फिर्यादीस देण्यात यावेत, असा आदेश दिले.या प्रकरणातील 6 आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली . 

Tags : Marathwada, Police, constable,  one, year, imprisonment