Mon, Jul 15, 2019 23:37होमपेज › Marathwada › हिंगोली : पोलिसांची हातभट्टीवर दबंग कारवाई; मुद्देमाल जप्त

हिंगोली : पोलिसांची हातभट्टीवर दबंग कारवाई; मुद्देमाल जप्त

Published On: Mar 02 2018 12:02PM | Last Updated: Mar 02 2018 12:02PMहिंगोली : प्रतिनिधी

सगळीकडे होळी आणि धुळवडीची धामधूम सुरू असताना जिल्ह्यात पोलिसांनी हातभट्ट्यांवर छापा टाकून कारवाई केली. शहरातील तलाब कट्ट्यासह ८ ठिकाणी छापा टाकण्यात आला. पोलीस अधिक्षक अरंविद चावरिया यांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली.

यबाबत मिळालेल्या माहितीनुसार,‘जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पथकाने आज सकाळी ५ वाजल्यापासून हिंगोली शहरातील हातभट्टी अड्ड्यांवर छापा टाकून ९१ हजार ७६४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अड्डाचालकांवर विविध कलमा नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रकिया शहर पोलीसात सुरु आहे.        

पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मुलगिर, पोलीस उपनिरीक्षक तानाजी चेरले यांच्या मार्गदर्शनाखाली पोहका.उजगिरे,राठोड, पोलीस नाईक शेख शकील, सुधीर ढेबरे, सुनील अंभोरे, जिवन मस्के, शेख मुजीब, वसोवदिन, गायकवाड,  प्रदिप जाधव, महिला पोलीस मिराताई बामणिकर यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली