Wed, Jul 24, 2019 07:53होमपेज › Marathwada › परमिटचे बियाणे झाले गायब

परमिटचे बियाणे झाले गायब

Published On: Jun 30 2018 1:18AM | Last Updated: Jun 29 2018 11:49PMपालम : प्रतिनिधी

तालुक्यात खरिपासाठी पेरणी योग्य पाऊस झाला. शेतकर्‍यांना तालुका कृषी कार्यालयामार्फत सोयाबीनचे परमिट मिळूनही ग्रामीण बीज उत्पादन महामंडळाकडील बियाणे न देता चढ्या भावाने बाजारपेठेत विक्री केल्याचा आरोप शेतकर्‍यांतून होत आहे. या  प्रक्रियेच्या चौकशीची मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

 दोन वर्षांपासून शेतकरी पावसाअभावी संकटात होता.  यावर्षी समाधानकारक पावसामुळे  तालुका कृषी कार्यालयामार्फत ग्रामीण बीज उत्पादन हंगाम 2018 मध्ये  सोयाबीन बियाणांचे परमीट पंधराशे शेतकर्‍यांना वितरित केले. यापैकी दोनशे शेतकर्‍यांना हे बियाणे दिले. या कार्यालयामार्फत दिले जाणारे सोयाबीनचे बियाणे गंगाखेड तालुक्यातील जनसेवा कृषी केंद्र, बालाजी कृषी केंद्र, जय किसान सेवा केंद्र, श्याम कृषी सेवा केंद्र यासह अन्य कृषी केंद्रातून परमीट दिलेल्या शेतकर्‍यांना वाटप न करता संबंधितांनी ते अधिकार्‍यांच्या संगनमताने चढ्या भावाने विक्री केल्याचा आरोप  शेतकर्‍यांनी केला. 
ग्रामीण उत्पादन यांनी तालुक्यातील शेतकर्‍यांना सोयाबीन पिकाचे परमीट देऊनही दुकानदारांनी थट्टा केल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते वैजनाथ हत्तीअंबीरे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.