Sat, Jul 20, 2019 13:14होमपेज › Marathwada › आ. पवार मुख्यमंत्र्यांसमोर खोटे बोलले

आ. पवार मुख्यमंत्र्यांसमोर खोटे बोलले

Published On: Apr 17 2018 1:52AM | Last Updated: Apr 16 2018 10:37PMगेवराई : प्रतिनिधी 

दोन वर्षांपूर्वी गेवराई नगरपरिषदेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री पंकजाताई मुंढे यांच्या उपस्थितीत संजयनगर अन् परिसरातील कायदेशीर करण्यात आलेल्या अतिक्रमणाचा शासननिर्णयानुसार पिटीआर दोन महिन्यांत घरपोच देतो असे आश्वासन गेवराईच्या विद्यमान आमदारांनी दिले होते, मात्र दोन वर्षे उलटली तरी येथील घरांचा पिटीआर घरपोच मिळालेला नाही. आ. पवार हे मुख्यमंत्र्यांसमोर खोटे बोलल्याचा आरोप माजीमंत्री बदामराव पंडित यांनी केलो. 

गेवराई शहरातील तय्यबनगर येथे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या उपस्थितीत झालेल्या मुस्लिम युवकांचा पक्षप्रवेश व शिवसेना शाखास्थापना कार्यक्रमात ते बोलत होते. दि.15 एप्रिल रोजी सायंकाळी 8 वाजता सदरील पक्षप्रवेश व शाखास्थापना कार्यक्रम संपन्न झाला. 

तय्यबनगर येथील शाखास्थापनेवेळी पुढे बोलताना माजीमंत्री बदामराव पंडित म्हणाले की, संजयनगर, मोमीनपुरा, सावतानगर, तय्यबनगर, साठेनगर, इस्लामपुरा भागातील अतिक्रमणांना आम्ही 1995 पासून कायदेशीररित्या लढा देत नियमित करून घेतले, मात्र शासनाने पिटीआर देण्याचे आदेश देऊनदेखील नगरपरिषदेने ते दिलेले नाहीत. आ. पवार त्यांच्या आश्वासनाला विसरले असून ते साफ खोटे बोलत असल्याचा त्यांनी यावेळी आरोप केला. शहरातील तय्यबनगर येथील शाखेसह शिवसेनेच्या 8 शाखा ह्या पूर्णतः मुस्लिम समाजाच्या झालेल्या आहेत. 

यावेळी शिवसेना शाखाप्रमुख सोहेल तांबोळी, उपशाखाप्रमुख शेख अब्बू, सचिव शेख अरबाज आदींसह शेख अजीम, शेख आवेज, शेख सोहेल, अफसर पठाण, शेख मोनू, मोमीन अमीर, हानीब पठाण, शेख नजीर, शेख अल्ताफ, शेख जुनेद, मार्गदर्शक सय्यद आसिफ आदींनी माजीमंत्री बदामराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला.

Tags : Pawar lied before the chief ministers says Badamrao Pandit