Mon, Mar 25, 2019 17:28होमपेज › Marathwada › शिवभक्तांनी अनुभवली रोमांचक पदभ्रमंती

शिवभक्तांनी अनुभवली रोमांचक पदभ्रमंती

Published On: Jul 23 2018 1:09AM | Last Updated: Jul 22 2018 11:25PMपरभणी : प्रतिनिधी

साडेतीनशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांनी जो ऐतिहासिक पराक्रम घडविला त्याची साक्ष देणार्‍या कोल्हापूर प्रांतातील रणसंग्राम आणि पन्हाळगडापासून पावनखिंडीपर्यंतचा पायी खडतर प्रवास अनुभवण्यासाठी नुकतीच महापदभ्रमंती मोहीम शिवराष्ट्र हायकर्सने आयोजित केली होती. परभणीच्या 30 शिवभक्तांनी भरपावसात घनदाट जंगले, भरून वाहणारे ओढे पार करत सह्याद्रीच्या निसर्गरम्य सान्निध्यातून केलेली ही तीन दिवसीय  पदभ्रमंती अविस्मरणीय ठरली.

देशभरातील 465 मावळ्यांनी मोहीम फत्ते केली. सरदारांचे वंशज, अभिनेते मिलिंद गुणाजी यांच्या प्रमुख उपस्थितीत भगवा झेंडा दाखवून मोहिमेला प्रारंभ झाला. सरदारांच्या वंशजांच्या मार्गदर्शनामुळे मोहिमवीरांमध्ये ऊर्जा निर्माण झाली ज्येष्ठ इतिहास संशोधक अप्पा परब, शिवव्याख्याते दीपकराव करपे, प्रा.डॉ.विनोद बाबर, भूपाल शेळके, समाधान जाधव यांच्या व्याख्यांनांमुळे विचारांची शिदोरी मिळाली. शाहीर दिलीप सावंत यांच्या पोवाड्यांमुळे मोहिमवीरांना चैतन्य मिळाले.

पावनखिंड येथे युवराज खा. संभाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत मोहिमेचा समारोप झाला. दुर्गअभ्यासक व शिवराष्ट्रचे अध्यक्ष प्रशांत साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम अभ्यासपूर्ण राबविण्यात आली.   मोहिमेत परभणीतील राजेश्‍वर गरुड, माधव यादव, भगवानराव पवार, बालासाहेब डोंगरे, केशवराव मुंडे, प्रदीप धर्मशेट्टी, व्यंकटेश शिंदे, दिपक नागुरे, किशोर सोळंके, बाळासाहेब घाटोळ, अनिल उडानशिव, भागवतराव काळबांडे, कल्याणराव अवचार,  दिलीपराव भराडे, अ‍ॅड.सोमनाथ व्यवहारे, भगवानराव गरुड, राम गोरे, उत्तम आहेर, अ‍ॅड.गणेश यादव, अंगद गरुड, वैभव सावंत, बाळासाहेब काळे, गुलाब गरुड, मधुकर गरुड, राजू टेकाळे, अ‍ॅड.शामराव झिंजान, अ‍ॅड.विलास कदम यांचा समावेश होता.