Wed, Jul 17, 2019 20:01होमपेज › Marathwada › महाराष्‍ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र

परळी : मराठा मोर्चा समन्वयकांची सुरक्षेची मागणी

Published On: Jul 31 2018 5:12PM | Last Updated: Jul 31 2018 5:12PMपरळी- वैजनाथ : प्रतिनिधी

परळीत चौदा दिवसापासून सुरू असलेल्या मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन आज ही सुरूच आहे. या आंदोलनातील  मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील म्हणाले, राज्यातील सुरू असलेले आंदोलन हे शांततेत होत असताना, काही समाजविघातक वृत्ती आंदोलनात घुसून आंदोलन हिंसक करण्याचा प्रयत्न करत आहेत. 

या समाज विघातक वृत्तीपासून मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांच्या जीवाला धोका असल्याने सुरक्षा देण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आली आहे.

यामध्ये मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील, रमेश केरे पाटील, महेश हरिदास डोंगरे, विवेकानंद यशवंत बाबर,  सुनील सुर्यभान नागणे,  संजय सावंत,  अप्पासाहेब कुढेकर, संतोष सूर्यराव, अमित घाडगे यांना तात्‍काळ व कायमस्वरूपी विनामोबदला सुरक्षा देण्याची मागणी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आली आहे.