Mon, Jul 22, 2019 04:29होमपेज › Marathwada › स्वच्छ भारत स्पर्धेत परभणीची बाजी

स्वच्छ भारत स्पर्धेत परभणीची बाजी

Published On: May 18 2018 1:18AM | Last Updated: May 18 2018 12:14AMपरभणी : प्रतिनिधी

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देशपातळीवर झालेल्या स्पर्धेत नागरिकांचा प्रतिसाद या गटात परभणीने अव्वल स्थान पटकाविले आहे.  2 हजार 824 नागरिकांनी विविध माध्यमातून ऑनलाइन सहभाग नोंदविला.

वास्तविक परभणीचे नाव स्वच्छतेसाठी घेण्याचे कधी कारण नव्हते, पण गेल्या तीन-चार वर्षांत महापालिका प्रशासन आणि नागरिकांनी संयुक्त प्रयत्नातून शहर स्वच्छतेचा विडा उचलला. शहरात 12 कोटी 91 लाख रुपये खर्च करून 62 ठिकाणी सार्वजनिक शौचालये बांधली. नागरिकांना वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी अनुदान देऊन शौचालय बांधणे अनिवार्य केल्याने मागास भागातही शौचालयाचा वापर सुरू झाला.

शहर स्वच्छतेसाठी वैयक्तिक स्वच्छता जनजागृती मोहिमेत शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. कचरा व्यवस्थापनासाठी मनपाने कचरा विलगीकरणाची मोहीम राबविली. त्यासाठी शहरात 80 घंटागाड्या, 10,704 टिप्पर, पाच ट्रॅक्टर  शहरामध्ये जेसीबीद्वारे ओला व सुक्या कचर्‍याचे वर्गीकरण केले जाते. मनपाने नागरिकांना आवाहन  करून कचरा व्यवस्थापनाचे महत्त्व पटवून दिल्याने शहरवासीयांनी यात सहभाग नोंदवून ओला व सुका कचर्‍याचे विलगीकरण करणे सुरू केले.

स्पर्धेत नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा ठरला. राष्ट्रीय पातळीवरील या स्पर्धेत नागरिकांच्या सहभागात व विशिष्ट लोकसंख्या गटात परभणीने अव्वल स्थान मिळवल्याने प्रथम पुरस्कार जाहीर झाला. मनपातर्फे तयार केलेल्या कचर्‍यापासून अल्पकिमतीत नागरिकांना खत विक्री झाली. उद्यान, व्यापारपेठ, सार्वजनिक मालमत्ता, बसस्टँड, रेल्वे स्टेशन, सरकारी दवरूाखाना, प्रशासकीय इमारत, सार्वजनिक रस्ते, पानटपरी, दुकाने, शॉपी कॉम्प्लेक्स, हॉस्पिटल्स या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविली होती. 

शहर स्वच्छतेच्या दृष्टीने नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. शहर सुंदर व स्वच्छ बनविण्यासाठी, देशपातळीवरील स्वच्छ सर्र्वेेक्षणात विजेता ठरण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. शहरास त्यांच्या सहभागातून प्रथम पुरस्कार जाहीर झाला असून तो निधी प्रमाणपत्राच्या स्वरूपात राहील. - डॉ. विद्या गायकवाड, उपायुक्त, मनपा