Tue, Mar 26, 2019 07:38होमपेज › Marathwada › महाआरोग्य शिबिरास लोटला जनसागर  तपासणी

महाआरोग्य शिबिरास लोटला जनसागर  तपासणी

Published On: Feb 14 2018 2:53AM | Last Updated: Feb 14 2018 2:36AMपरभणी ः प्रतिनिधी 

 शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे  महाआरोग्य शिबिराच्या पहिल्याच दिवशी 35 हजार रुग्णांनी नोंदणी करून उपचार घेतले. सकाळी 9 वाजता सुरुवात झालेल्या या शिबिरात  जवळपास दहा हजार रुग्णांची तपासण करण्यात आली.पाच दिवस चालणार्‍या या शिबिरात परभणी विधानसभेतील सर्कलनिहाय येणार्‍या गावांतील नागरिकांची मोफत तपासणी करण्यात येत आहे. नूतन विद्या मंदिर शाळेच्या मैदानावर महाशिबिराचे अभूतपूर्व नियोजन ही संकल्पना आयोजक आ. डॉ. राहुल पाटील यांची  आहे. या शिबिरात येणार्‍या प्रत्येक रुग्णांची वैयक्‍तिक काळजी घेऊन त्यांना उपचार टेबलापर्यंत पोहोचविण्यासाठी शिवसैनिक नियुक्‍त केले आहेत.

त्यामुळे प्रशस्त नियोजनात पार पडत असलेल्या या महाशिबिरात समाजातील सर्वचस्तरातील नागरीक, रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. तपासणीसाठी टेबलनिहाय वैद्यकीय अधिकारी, नर्स व मदतनिसांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. आजारानुसार डॉक्टर उपस्थित असल्याने रुग्णांना आपल्या अनेक आजारांसंदर्भात एकदाच उपचार घेण्याची व्यवस्था या शिबिराच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. रुग्णांना मोफत औषध पुरवठा ही केल्या जात आहे. शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या रुग्णांना पुढील कार्यवाहीची माहिती देऊन शस्त्रक्रियेसाठी संपर्क केल्या जाईल, असे सांगण्यात येत आहेत. सर्व प्रकारच्या आजारांवर उपचार करण्यात येत आहे. यात विशेषतः हृदयरोग, जनरल सर्जरी, कान, नाक, घसा, श्‍वसन विकार, क्षयरोग, कर्करोग, स्त्री रोग, मेंदू रोग, प्लास्टिक सर्जरी, नेत्ररोग, ग्रंथीचे विकार, गुप्‍त रोग, बालरोग, मूत्ररोग, अस्थिव्यंगोपचार, त्वचा रोग, मानसिक आरोग्य, आयूष, आयुर्वेद आदी संदर्भात उपचार करण्यात येत आहे.