Thu, Nov 15, 2018 01:02होमपेज › Marathwada › परभणी ग्रामपंचायत पोटनिवडणुकांचा निकाल जाहीर

परभणी ग्रामपंचायत पोटनिवडणुकांचा निकाल जाहीर

Published On: Mar 01 2018 1:34AM | Last Updated: Feb 28 2018 11:59PMपरभणी : प्रतिनिधी

तालुक्यातील 17 ग्रामपंचायतींच्या 23 जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. यात 15 जागांसाठी नामांकन अर्ज दाखल झाले नाही तर पाच जागांसाठी एकच नामांकन अर्ज आल्याने त्या जागा बिनविरोध निघाल्या आहेत. शिल्‍लक 3 जागांसाठी मंगळवारी मतदान घेण्यात आले. या जागांचा निकाल 28 फेबु्रवारी रोजी सकाळी 10 वाजता तहसील कार्यालयात मतमोजणीनंतर जाहीर करण्यात आला. मतदान घेण्यात आलेल्या जागांमध्ये ताडपांगरी येथील 1 प्रभागातील जागेसाठी तीन उमेदवार रिंगणात होते. यात कालिंदीबाई वैरागर यांना 126 मते मिळाली, तर प्रतिस्पर्धी असलेल्या कलावती कांबळे यांना केवळ 84 मते मिळाली आहेत. या प्रभागातील 2 मतदारांनी नोटाला पसंती दिली आहे.

करडगाव येथे प्रभाग 3 मधील एका जागेसाठी 2 उमेदवार होते. यामध्ये नारायण खिस्ते यांना 194 मते मिळाली तर दत्ता मुंढे यांना 63 मते मिळाली. या प्रभागातील 1 मतदाराने नोटाला पसंती दिली. दैठणा ग्रामपंचायतच्या प्रभाग 4 मधील एका जागेसाठी चांगलीच चुरस झाली होती. या जागेसाठी 5 उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरले होते. यात आबाराव कच्छवे यांना 271, नारायण कच्छवे यांना 38, भगवान कच्छवे यांना 35, भागवत कच्छवे यांना 131, विश्‍वंभर कच्छवे यांना 93 मते मिळाली आहेत. या प्रभागातील 15 मतदारांनी नोटाला पसंती दिली आहे. परभणी तहसील कार्यालयात मतमोजणी दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पं. स. विस्तार अधिकारी जी. एम. गोरे, जिल्हा परिषद आरोग्य विभागातील आरोग्य पर्यवेक्षक संतोष लाटकर, कार्यालयीन अधीक्षक पी. डी. गुसेंगे यांनी 
काम पाहिले.