Sun, Feb 24, 2019 09:22होमपेज › Marathwada › बबई माहितीपट महिला सबलीकरणाचे उत्तम उदाहरण

बबई माहितीपट महिला सबलीकरणाचे उत्तम उदाहरण

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

परभणी : प्रतिनिधी

कैझन पिक्चर्स परभणी, अरभाट फिल्म क्लब पुणे, श्री शिवाजी महाविद्यालय परभणी  यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या परभणी फिल्म क्लबच्या 11 व्या कार्यक्रमात बबई हा माहितीपट दाखविण्यात आला.  त्या निमित्ताने दिग्दर्शक कविता दातीर, अमित सोनावणे (पुणे) व प्रमुख पाहुणे महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ.फौजिया खान उपस्थित होत्या.

अनेक पुरस्कारप्राप्त माहितीपट बबईच्या सादरीकरणानंतर दिग्दर्शकांनी मनोगताद्वारे माहितीपटामागील कलात्मक दृष्टिकोन प्रेक्षकांसमोर मांडला.  तसेच प्रेक्षकांनी सुध्दा प्रश्न विचारुन शंकाचे समाधान केले. वयाच्या 21 व्या वर्षी विधवा झालेल्या 5 मुलांची माता असलेल्या पुण्यातील बबुताई लबडे ऊर्फ बबई यांनी हलाखीच्या परिस्थितीमुळे हातगाडा चालविण्याचे काम स्वीकारले. पुरुषप्रधान संस्कृतीला न जुमानता   कुटुंबाचा रहाटगाडा आजही आत्मविश्वासाने व खंंबीरपणे चालवित आहेत.   वयाच्या 81 व्या वर्षी 200 ते 300 किलोचे ओझे त्या रोज हातगाड्यावरून नेतात. त्यांचा हा संपूर्ण जीवन प्रवास बबई या माहितीपटात दिग्दर्शक कविता दातीर व अमित सोनावणे यांनी मांडला आहे. आयुष्यात वाईट अनुभवांना सामोरे जाऊनसुध्दा खडतर आयुष्य जगणार्‍या बबुताईंचा जीवनाबद्दलचा सकारात्मक दृष्टिकोन कौतुकास्पद आहे व सर्व स्तरातील  महिलांना प्रेरणा देणारा आहे.  असा अनुभव प्रेक्षकांना माहितीपट बघून मिळाला.

डॉ. फौजिया खान यांनी परभणी फिल्म क्लब या उपक्रमाचे कौतुक केले व भविष्यात सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमास परभणी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नागेश कुलकर्णी यांनी केले. प्रास्ताविक परभणी फिल्म क्लबचे संस्थापक रवि पाठक यांनी केले. त्र्यंबक वडसकर, अतुल साळवे,  सोहम खिल्लारे, रुतुराज भोसले, गजानन नाल्टे, शुभम एडके, आदर्श कवळीकर, ईश्वर पाटोळे, सौरभ कुरुंदकर, वैभव शिंदे, संपत्ती डावरे आदींनी मेहनत घेतली.

Tags : Marathwada, Marathwada News, Parbhani Film Festival,  Parbhani


  •