Thu, Jul 18, 2019 15:08होमपेज › Marathwada › परभणी जिल्हा वकील संघाचा मराठा आरक्षणास पाठिंबा

परभणी जिल्हा वकील संघाचा मराठा आरक्षणास पाठिंबा

Published On: Aug 10 2018 12:58AM | Last Updated: Aug 09 2018 10:00PMपरभणी : प्रतिनिधी

परभणी जिल्हा वकील संघाने 9 ऑगस्ट रोजी सकल परभणी जिल्हा वकील सभासदांची सर्वसाधारण बैठक घेवून मराठा समाजाने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला पुर्ण पाठींबा दिला. सर्व संमतीने ठराव पारीत केला असून मराठा आरक्षणाची मागणी अत्यंत न्यायपुर्ण आहे, अशी भावना वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. दिपक देशमुख यांनी व्यक्त केली. 

जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष दिपक देशमुख यांच्या नेतृत्वाखाली गुरूवारी दुपारी सर्व पदाधिकार्‍यांनी जिल्हा कचेरीत जावून निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांना ठरावाची प्रत व मागणीचे निवेदन दिले. यावेळी उपाध्यक्ष अ‍ॅड. मनोज कुंभारीकर, सचिव अ‍ॅड. मनोहर जाधव, सहसचिव अ‍ॅड. उर्मिला रोडगे, अ‍ॅड. लक्ष्मण काळे आदी उपस्थित होते. मराठा आरक्षणाच्या न्याय मागणीसाठी मराठा समाजाने यापुर्वी देखील शांततापुर्वक मार्गाने 58 मुक मोर्चे महाराष्ट्रभर काढले आहेत. मात्र शासनाकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मराठी आरक्षणाची मागणी अत्यंत न्यायपूर्व आहे. त्यामुळे कायदेशीर प्रक्रिया लवकरात लवकर पुर्ण करून राज्यात सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करण्याकरीता मराठा आरक्षणाची मागणी त्वरीत पूर्ण करावी, त्याचाच एक भाग म्हणून वकिल संघाने मराठा आरक्षणास पाठिंबा दिला आहे. मुख्य मंत्री व राज्य मागासवर्ग आयोगास भावना कळविण्याची विनंतीही निवेदनात करण्यात आली आहे.