होमपेज › Marathwada › ८ जणांना न्यायालयीन कोठडी

८ जणांना न्यायालयीन कोठडी

Published On: May 19 2018 1:33AM | Last Updated: May 19 2018 12:02AMपरभणी : प्रतिनिधी

जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाचे गेट बंद करून उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयात तोडफोड करणार्‍या 8 जणांना पोलिसांनी 17 मे मे रोजी अटक केली होती. त्यांना 18 मे रोजी न्यायालयात हजर केले असताना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 

पीक विम्याच्या प्रोसिडिंगची माहिती घेण्यासाठी आठजण 17 रोजी कृषी अधीक्षक कार्यालयात गेले होते; परंतु त्या ठिकाणी काही कारणास्तव वाद-विवाद झाला. यानंतर त्यांनी कृषी अधीक्षक कार्यालयाचे मेन गेट बंद करून आंदोलन केले. उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयात जाऊन माहितीची विचारणा संबधित आंदोलकांनी केली. त्यात अधिकारी व त्यांच्यात बाचाबाची झाली. यानंतर त्यांनी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास कार्यालयात तोडफोड केल्याची तक्रार उपविभागीय कृषी अधिकारी आर.टी.सुखदेव यांच्या फिर्यादीवरुन तोडफोड करणार्‍या आरोर्पींविरुद्ध नानलपेठ पोलिसात  गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी  आरोपी सुभाष कदम, रमेश दुधाटे, गणपतराव भोसले, माणिक शिंदे, माउली कदम, ज्ञानोबा गोरवे, रोहिदास भडके, ज्ञानोबा जोगदंड यांना अटक केली. त्यांना 18 रोजी न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, अशी माहिती स. पो. नि. चिंचोलकर यांनी दिली.