Fri, May 24, 2019 03:12होमपेज › Marathwada › डीएमएलटी प्रयोगशाळांना पॅरामेडिकल कायद्याचे संरक्षण

डीएमएलटी प्रयोगशाळांना पॅरामेडिकल कायद्याचे संरक्षण

Published On: Feb 06 2018 1:47AM | Last Updated: Feb 05 2018 9:36PMपरभणी : प्रतिनिधी

महाराष्ट्रातील पॅरामेडिकल लॅबोरेटरी चालविणार्‍या डी.एम.एल.टी. धारकांना पॅरामेडिकल कायद्याचे संरक्षण असल्याचा दावा अक्‍लॅप पॅरामेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन परभणी या संघटनेने केला आहे. 

या संदर्भात संघटनेने महानगरपालिका आयुक्तांना निवेदन सादर करून न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. काही संघटना डी.एम.एल.टी. पदवीधारकांचा अपप्रचार करीत असल्याचा आरोप अक्‍लॅप पॅरामेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन परभणी शाखेद्वारे करण्यात येत आहे. परभणी मनपा आयुक्त, जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 
 डी.एम.एल.टी. व तत्सम पदवीधारक हे पॅरामेडिकल क्‍लिनिकल लॅबोरेटरी चालवितात त्यांना त्याबाबतचे पूर्ण शिक्षण व ज्ञान आहे. तसेच ते कायद्याद्वारे पॅरामेडिकल प्रॅक्टिशनर्सच्या कक्षेत येतात.

ते कोणतेही हिस्टोपॅथोलॉजी, कॅथोलॉजी, एफ.एन.ए.सी. या सारख्या पॅथॉलॉजिकल रिपोर्टवर सही करीत नाही व कोणत्याही प्रकारचे निदान करीत नाही व डॉक्टर हा शब्द आपल्या नावासमोर वापर नाहीत, असा दावा अक्‍लॅप पॅरामेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन परभणीने केला आहे. तथापि काही संघटना व्यावसायिक द्वेषातून डी.एम.एल.टी. धारकांचा अपप्रचार करीत असल्याचे संघटनेने म्हटले आहे. डी.एम.एल.टी. धारक राज्याच्या आरोग्य सेवेमध्ये, शासकीय सेवेमध्ये तळागाळातील दुर्गम भागात जाऊन आरोग्यसेवा देत आहेत. डी.एम.एल.टी.धारक उच्च तंत्रज्ञान प्राप्त पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीद्वारे आरोग्य सेवा देत आहेत. डी.एम.एल.टी. धारक उच्च तंत्रज्ञान प्राप्त पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीद्वारे आरोग्य सेवा देत आहेत. याची दखल घेऊन शासनाने कायदा बनवून शेवटच्या घटकांपर्यंत आरोग्य सेवा देणारे पुरोगामी राज्य असल्याचे सिद्ध केले आहे. परंतु काही संघटना डी.एम.एल.टी. लॅब धारकांना व्यवसाय करण्यापासून वंचित करीत असल्याचे संघटनेने निवेदनात म्हटले आहे.  यामुळे व्यक्ती व संघटनेमार्फत करण्यात येत असलेल्या डी.एम.एल.टी. धारकांचा अपप्रचार करणार्‍यांवर शासनाने कठोर कार्यवाही करावी असे अक्‍लॅप पॅरामेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन परभणी शाखेचे म्हणणे आहे.  निवेदन देताना अध्यक्ष मोतीराम निकम, श्रीनिवास पांगरकर, सचिव विनोद कांबळे, उपाध्यक्ष अहेमद हुसैन, मो. खालेद, शिवेंद्र गौतम, दिपक कांबळे, अनिलकुमार गायकवाड, विजय मोरे, किरण आंबेकर, गोविंद चव्हाण, खालेद देशमुख, भगवान वैद्य, गीतांजली मंगरूळकर व इतर सदस्य उपस्थित होते.