Sun, Aug 25, 2019 01:30होमपेज › Marathwada › 'पंकजा मुंडे यांचे मानसिक संतुलन बिघडत आहे'

'पंकजा मुंडे यांचे मानसिक संतुलन बिघडत आहे'

Published On: Apr 22 2019 8:56PM | Last Updated: Apr 22 2019 8:56PM
केज : प्रतिनिधी 

राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी जालना येथील प्रचारसभेत बोलताना राहुल गांधींवर केलेल्या वक्तव्याचा हिमाचल प्रदेशच्या प्रभारी व काँग्रेसच्या नेत्या रजनीताई पाटील यांनी खरपूस समाचार घेतला. मुंडेंवर व भाजपवर हेच संस्कार आहेत का? असा सवाल पाटील यांनी ट्वीट करून केला.

अधिक वाच : राहुल गांधींच्या गळ्यात बॉम्ब बांधून पाकिस्तानला पाठवायला हवे होते मग कळाले असते : पंकजा मुंडे 

मंत्री पंकजा मुंडे यांनी जालना येथील प्रचारसभेत बोलताना राहुल गांधी यांना एखाद्या बॉम्बला बांधून दुसऱ्या देशात टाकायला हवं होतं म्हणजे त्यांना सर्जिकल स्ट्राईक समजेल अशी टीका केली होती.

सध्या काँग्रेस व भाजपा मध्ये चांगलेच प्रहार सुरू असून भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करताना आतंकवादी भाषा वापरल्याने चांगलीच खळबळ उडाली. या वक्त्यव्याचा काँग्रेस नेत्या रजनीताई पाटील यांनी निषेध नोंदवत पंकजा मुंडे यांचे मानसिक संतुलन बिघडले असून त्यांच्यावर व त्यांच्या पक्षावर हेच संस्कार आहेत का असा सवाला केला. तर अभद्र भाषेबरोबरच आतंकवादी भाषांचा देखील आता हे भाजपवाले वापर करू लागले असून हीच भाजपची विचारधारा असल्याचे रजनीताई पाटील यांनी ट्विट करत भाजपा व पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे.