Sun, Jul 21, 2019 07:50होमपेज › Marathwada › पंकजा मुंडे यांनी ‘गड’ राखला

पंकजा मुंडे यांनी ‘गड’ राखला

Published On: Apr 07 2018 1:38AM | Last Updated: Apr 07 2018 12:31AMबीड : प्रतिनिधी

पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी गत तीन दिवसांत जिल्हाभरात दौरे करत विकासकामांची उद्घाटने केली. गुरुवारी भगवानगड व नारायणगडच्या नारळी सप्ताह सांगतेप्रसंगी दोन्ही महंतांचे आशीर्वाद घेत विकासाची हमी दिल्याने पंकजा मुंडे यांनी गड राखल्याची चर्चा होत आहे.बीड जिल्ह्यात गडांना विशेष महत्त्व आहे. नगर जिल्ह्यात परंतु बीड जिल्ह्याच्या सीमेवर असलेला भगवानगड आणि बीड जवळ असलेला नारायणगड या दोन्ही गडांचे नारळी सप्ताह गत सात दिवसांपासून अनुक्रमे तागडगाव आणि सौंदाना येथे सुरू होते. तागडगाव येथील सप्ताहाच्या प्रारंभाला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खा. प्रीतम मुंडे यांच्यासह अन्य नेत्यांनी हजेरी लावली होती. या सप्ताहाच्या सांगतेला पालकमंत्री पंकजा मुंडे जाणार का, गेल्या तर भाषण करणार का, याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती.

गुरुवारी दुपारी पालकमंत्री पंकजा मुंडे या हेलिकॉप्टरने या ठिकाणी पोहचल्या. गावकर्‍यांनी त्यांची रथातून मिरवणूक काढत जंगी स्वागत केले. सप्ताहाच्या व्यासपीठावर जाताच पंकजा मुंडे यांनी महंत नामदेव शास्त्री महाराज यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी पंकजा मुंडे यांनी भाषणातून समाजाला एकसंघ राहण्याचे आवाहन केले. यानंतर सौंदाना येथील नारायणगडच्या सप्ताहात भेट देऊन महंत शिवाजी महाराज यांचे आशीर्वाद घेतले. या ठिकाणीही त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. दोन्ही गडाच्या महंतांचे आशीर्वाद घेऊन पंकजा मुंडे यांनी गड राखल्याचीच चर्चा जिल्हाभरात होत होती.  पंकजा मुंडे यांची जिल्ह्याच्या राजकारणावरील पकड अधिक घट्ट होत आहे.

Tags : Marathwada, Pankaja Munde, Protected,  Ghad