Mon, Aug 19, 2019 09:05होमपेज › Marathwada › पंकजा मुंडे -नामदेव शास्त्री यांच्यातील वादावर पडदा

पंकजा मुंडे -नामदेव शास्त्री यांच्यातील वादावर पडदा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बीड : उतम हजारे

श्री क्षेत्र भगवानगडाच्या नारळी सप्ताहाची सुरुवात भगवानगडाचे मठाधिपती, ह.भ.प.न्यायाचार्य डॉ.श्री.नामदेव महाराज शास्त्रीजी यांच्या हस्ते झाली. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व खासदार प्रीतम मुंडे, भगवानगडाचे प्रधान आचार्य ह.भ.प.श्री.नारायण शास्त्री, ह.भ.प.विवेकानंद महाराज शास्त्री, ह.भ.प.अतुल महाराज शास्त्री, ह.भ.प.बाबासाहेब महाराज बडे, माजी आमदार सुरेश नवले, संदीप क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती. 

श्री संत भगवानबाबा यांनी प्रारंभ केलेल्या ८५ व्या नारळी सप्ताहाची सुरुवात काल दि.२९ रोजी झाली. यावेळी महंत शास्त्रीजी म्हणाले की, भाषणाचा वाद हा केवळ श्री क्षेत्र भगवानगडापुरता मर्यादित होता. भगवानगड भाषणमुक्त झाल्यामुळे तो विषय आता संपलेला आहे.  त्यामुळे पंकजा मुंडे-नामदेव शास्‍त्री वादावर पडदा पडल्याचे बोलले जात आहे. 

यावेळी खासदार प्रीतम मुंडे म्हणाल्या की,  मी नेता म्हणून नव्हे तर बीड जिल्ह्याची लेक म्हणून या सप्ताहाला आले आहे. श्री संत भगवानबाबांचे नाव काढले तरी हृदय प्रेमाने ओथंबून येते.

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेनीं देखील गडासंदर्भातील आपली भूमिका मांडली.  हे व्यासपीठ राजकीय नसून धार्मिक आहे. त्यामुळे कुठे काय बोलावं याची मर्यादा मी पाळतो. आदरणीय महंत नामदेव महाराज शास्त्रीजी यांनी संधी दिल्यामुळेच मी या व्यासपीठावर दोन शब्द बोलतोय. आपली सर्वांची श्री क्षेत्र भगवानगडावर अतोनात श्रद्धा आहेच. परंतु आपल्या मनातील मंदिरामध्ये श्री क्षेत्र भगवानगडाचे विचार तेवत ठेवले पाहिजेत. 

श्री क्षेत्र भगवानगड हे केवळ आशीर्वाद मिळवण्याचे ठिकाण आहे. यावेळी स्टेजवरील मंडळींसह हजारो भाविकांनी श्री संत भगवानबाबांच्या नावाचा जयघोष करत मंत्रपुष्पांजली अर्पण करुन सप्ताहाची सुरुवात करण्यात आली.


  •