Thu, Apr 25, 2019 17:40होमपेज › Marathwada › नगराध्यक्षपदी अनिता हत्तीअंबिरे 

नगराध्यक्षपदी अनिता हत्तीअंबिरे 

Published On: May 24 2018 1:32AM | Last Updated: May 23 2018 10:10PMपालम : प्रतिनिधी

येथील नगर पंचायतीच्या अध्यक्षपदी अनिता जालिंदर हत्तीअंबिरे तर उपनगराध्यक्षपदी बालासाहेब गणेशराव रोकडे यांची बिनविरोध निवड झाल्याचे निर्वाचन अधिकारी तथा गंगाखेडच्या उपविभागीय अधिकारी सुचिता शिंदे यांनी जाहीर केले.

 नगरपंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडीसाठी बुधवारी (दि. 23) दुपारी 2 वाजता नगरपंचायतीच्या सभागृहात विशेष सभा बोलावण्यात आली होती. नगराध्यक्षपदासाठी अनिता हत्तीअंबिंरे तर उपनगराध्यक्षपदासाठी बालासाहेब रोकडे यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल झाल्यामुळे दोघांचीही बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. 19 सदस्यांपैकी 6 सदस्य गैरहजर होते. अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड जाहीर होताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांचा सत्कार भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा माजी जि. प. सदस्य गणेशराव रोकडे, डॉ. रामराव उंदरे, लक्ष्मणराव रोकडे, सिद्धार्थ हत्तीअबिंरे, शेख मुस्तफा, अजीम पठाण, उबेदखाँ पठाण, गजानन रोकडे, डॉ. शेख बडेसाब, बाबासाहेब एंगडे, सलमान खान, दत्ता घोरपडे, लिंबाजी टोले, गणेशराव घोरपडे, मोबीन कुरेशी, लाल खान पठाण, असदखाँ पठाण, गौतम हत्तीअंबिरे, गणेश हत्तीअंबिंरे, शेख मुसा, वैजनाथ हत्तीअंबिंरे, माउली घोरपडे, कल्याण हनवते, नवनाथ हत्तीअंबिंरे, कैलास चामले, निवृत्ती हत्तीअबिंरे, कल्याण हनवते आदी कार्यकर्त्यांनी स्वागत केले.