Wed, Apr 24, 2019 21:31होमपेज › Marathwada › मोबाइलच्या वापरामुळे मैदानी खेळ हद्दपार

मोबाइलच्या वापरामुळे मैदानी खेळ हद्दपार

Published On: May 27 2018 1:19AM | Last Updated: May 26 2018 10:26PMशिरडशहापूर : प्रतिनिधी

औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर भागाता सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्यामुळे लहान मुले मोबाइलमध्ये असलेल्या खेळामुळे पारंपरिक मैदानी खेळ मात्र हद्दपार होत असल्याचे चित्र आहे. मोबाइलच्या अति वापरामुळे लहान मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्‍त केली जात आहे.

तालुक्यातील शिरडशहापूर भागात गेल्या काही वषार्र्ंपासून मोबाइलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याचा दिसून येत आहे. घरातील प्रत्येक व्यक्‍तीकडे अ‍ॅन्ड्रॉइड मोबाइलचा वापर होत आहे. मोबाइल कंपन्या बोलण्यासह इंटरनेटचा डाटा एक जिबीपासून ते दोन जिबीपर्यंत मिळत आहे. या इंटरनेटमुळे आरोग्यावर चांगला वाईट परिणाम होत आहे. त्यातच इंटरनेटवरून विविध प्रकारचे खेळ लहान मुले डाऊनलोड करत आहेत.

दररोज इंटरनेटवर वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळ दाखल होत आहेत. नवीन खेळ आल्यानंतर लहान मुले तासन्तास मोबाइल हातात घेऊन खेळत बसतात. मोबाइलचे नवनवीन खेळ लहान मुलांच्या जीवावर सुध्दा बेतू शकतात, तसे प्रकारही घडल्याचेही अनेक उदाहरणे पाहावयास मिळतील. मोबाइलमध्ये नव्याने प्रवेश घेणार्‍या खेळामुळे लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. परिणामी एकटेपणा राहणे, अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होणे यासारख्या आदी समस्यांनी ग्रासले आहेत. 

तर मोबाइलच्या अति वापरामुळे पारंपरीक विटीदांडू, लपना छपनी, लगोरी, काच गोट्या, पोहणे, बेंगा पाणी, कोपरखळी, लोन भुर्रेव, सुरपाट असे पारंपरिक खेळ हद्दपार होण्याच्या मार्गावर आहेत.