Wed, Jul 17, 2019 20:02होमपेज › Marathwada › पिकांच्या नुकसानीचा पहिला हप्ता वितरणाचे आदेश

पिकांच्या नुकसानीचा पहिला हप्ता वितरणाचे आदेश

Published On: May 17 2018 1:27AM | Last Updated: May 16 2018 10:21PMपरभणी : प्रतिनिधी

सन 2017 मधील हंगामामध्ये कापूस व धान पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी बाधित शेतकर्‍यांना मदत वाटप करण्याकरिता परभणी जिल्ह्याकरिता एकूण मदतीची रक्‍कम रुपये 157 कोटी 97 लाख 92 हजार त्यापैकी पहिला हप्ता रक्‍कम रुपये 52 कोटी 66.00 लक्ष इतकी मंजूर केली आहे.  त्यापैकी 42 कोटी 12.00 लक्ष एवढा निधी बिम्स प्रणालीवर जिल्हाधिकारी कार्यालयास उपलब्ध करून देण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना हा निधी दिनांक 10 मे 2018 अन्वये वितरीत करण्याचे आदेश देण्यात आले आहे. 

तसेच परभणी www.parbhani.nic.in  या संकेतस्थळवर  जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त बाधित शेतकर्‍यांची यादी प्रसिद्धी केली असून त्यात आपले नाव व क्षेत्रांची तपासणी करून घ्यावेत तसेच बँक खाते क्रमांक व आधार कार्ड क्रमांक संबंधित तलाठी यांच्याशी संपर्क साधून तत्काळ देण्यात यावे जेणेकरून अनुदान बँक खात्यावर जमा करणे सुलभ होईल, असे  जिल्हाधिकारी परभणी यांनी कळविले आहे.