Tue, Apr 23, 2019 14:15होमपेज › Marathwada › आरटीओत केवळ चार कर्मचारी कार्यरत

आरटीओत केवळ चार कर्मचारी कार्यरत

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बीड : शिरीष शिंदे

सर्व सामान्य नागरिकांच्या संबंधीत असलेल्या उपप्रादेशक परिवहन कार्यालयात कर्मचार्‍यांची वानवा असल्याने नियमित कामे खोळंबली असल्याचे दिसून येत आहे. बीडच्या आरटीओ कार्यालयास एकूण 37 पद मंजूर आहेत, परंतु सध्य स्थितीला केवळ 4 कर्मचारी पूर्ण वेळ आहेत. 

विशेष म्हणजे, उपप्रादेशक परिवहन अधिकारी हे मुख्य पद जवळपास वर्षभरापासून रिक्‍त आहे. परिणामी हे कार्यालय कोणासाठीही आओ-जाओ घर तुम्हारा बनले आहे. दुचाकी, चार चाकी किंवा मोठे वाहन घेतल्यानंतर प्रत्येकास वाहनाची पासिंग करणे बंधनकारक आहे. वाहन खरेदी करणे पूर्वी पेक्षा आता अगदी सहज झाले असल्यामुळे वाहन संख्येत वाढ झाली आहे, परंतु वाहन पासिंग करण्यासाठीची कार्यालयीन यंत्रणा अगदी तोकडी असल्याने, सर्व सामान्यांची कामे खोळंबली आहे. लर्निंग लायसन्स अर्थात वाहन शिकाऊ परवाना काढण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, मात्र बहुतांश वेळा नोंदणीसाठीची साईड डाऊन असते, त्यामुळे कामे होत नाहीत असा अनुभव नागरिक व एजंट व्यक्‍त करतात. प्रत्येक दिवशी केवळ 100 लर्निंग लायसन्सला मंजुरी दिली जात होती.

मात्र आता प्रति दिन 200 लायसन्सला मंजुरी मिळाली असल्याने वेटिंग कमी झाली असली तरी, परमनंट लायसन्ससाठी अधिकारी नसल्यामुळे बराच वेळ लागत आहे. लायसन्स शिवाय वाहन पासिंग, वाहन तपासणी, जुनी लायनस नवीन करणे यासह इतर महत्वाची कामे पूर्ण करण्यासाठी अधिकारी असणे आवश्यक आहे. पूर्णवेळ अधिकारी आवश्यक असल्याची मागणी वारंवार करण्यात आली मात्र त्याकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. लोकसंख्येच्या तुलनेत कर्मचारी वाढणे गरजेचे असून, मंजूर पदेही दुपटीने पाहिजेत मात्र या उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आरटीओ कार्यालयात नेहमीपेक्षा अधिकची गर्दी पहावयास मिळत आहे. 

Tags : Marathwada, Marathwada News, four, employees, working,  RTO


  •