Sun, May 19, 2019 13:57
    ब्रेकिंग    होमपेज › Marathwada › ट्रक-ऑटो अपघातात एक ठार; सात जखमी

ट्रक-ऑटो अपघातात एक ठार; सात जखमी

Published On: Jun 25 2018 1:48AM | Last Updated: Jun 24 2018 11:02PMसेलू : प्रतिनिधी

ट्रक आणि ऑटो यांची समोरासमोर धडक होऊन ऑटोतील प्रवाशांपैकी एक ठार तर सात जखमी झाले. ही घटना रविवारी (दि.24)  सकाळी सात वाजेच्या सुमारास कुंडी पाटी परिसरात  घडली. ऑटोतील प्रवासी हे सिमूरगव्हाण परिसरातील स्वामी नरेंद्र महाराज  यांच्या  नाणीज उपपीठ  येथील धार्मिक समारंभाला उपस्थित राहण्यासाठी जात होते. 

सेलूतील  रेल्वेस्थानकापासून बाहेरून विविध ठिकाणांहून आलेले नरेंद्र महाराजांचे शिष्य सिमूरगव्हाण परिसरात नानीज उपपीठाकडे ऑटोद्वारे जात होते. रविवारी सकाळी 6 वाजून 50 मिनिटांनी पाथरीकडून भरधाव  येणारा व वीटाने भरलेला ट्रक (एम.एच.20 ए.टी. 1599 ) व सेलूहून सिमूरगव्हाणकडे जाणारा ऑटो (एम.एच. 20 टी. 3808) यांची समोरासमोर जोराची धडक झाली.

या  अपघातामुळे सेलू-पाथरी रस्ता पूर्णपणे बंद झाला होता. जखमींना अवस्थेतील प्रवासी मदतीची याचना करत होते. माउली गजमल, हरिभाऊ रवळगावकर, सुरेश मोगल, भगवान बालटकर, पंढरीनाथ मोगल, जमादार  एच .आर. पालवे, आनंदा थोरवट, बाळू कदम, सहायक उपनिरीक्षक शेख मुजीब अजिस भाई, हनुमान श्रीरंगराव नाईक आदींनी जखमींना  रुग्णवाहिकेद्वारे उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.