होमपेज › Marathwada › अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

Published On: Dec 15 2017 12:13PM | Last Updated: Dec 15 2017 12:13PM

बुकमार्क करा

गेवराई : प्रतिनिधी 

उमापुरकडून चौसाळा येथे दुचाकीवरून जात असलेल्या एका २५ वर्षीय तरूणास अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. हा अपघात गुरुवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास गेवराई -शेवगाव मार्गावरील बोरी-पिंपळगाव फाट्याजवळ घडला.

शहादेवला सुदाम सुरवसे (वय २५ रा.उमापुर) असे अपघातात ठार झालेल्या तरूणाचे नाव आहे. तो दुचाकीवरुन (क्र.एमएच २३ ए ९८८५) वरून जात असताना गेवराई-शेवगाव राज्य मार्गावरील बोरी-पिंपळगाव फाट्याजवळअज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. उमापुर येथील मधुकर आहेर यांनी हा प्रकार पाहिला असता त्यांनी शहादेवला उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले.

दरम्यान, आज सकाळी गेवराई पोलिसांनी पंचनामा करून येथील उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फौजदार अमोल मालुसरे करत आहेत.